-बापू मुळीक
सासवड : श्री गणेश विसर्जनासाठी सासवड नगरपालिकेने माजी वसुंधरा 4.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये सोपान काका मंदिर, वटेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर या तीन ठिकाणी कृत्रिम तलावासह मूर्ती व निर्माल्य संकलन, कलश केंद्राची व्यवस्था ही करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिली आहे.
गणेश विसर्जनासाठी या तीनही ठिकाणी गणेश भक्तांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. गणेश विसर्जनासाठी दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस, नवव्या दिवशी एकूण 400 गणेश मूर्ती नगरपालिकेत दान करण्यात आल्या आहेत. गणेश भक्ताकडून निर्माल्य इतरत्र न टाकता निर्मालय या कलशामध्ये टाकण्यात आले. यावेळी चार्ट निर्मालयाचे नगरपरिषदेत संकलन करून घनकचरा प्रकल्पावर तो प्रक्रियेसाठी पाठवण्यात आला आहे.
गणेशोत्सव हा सण नागरिकांनी पर्यावरण पूरक म्हणून साजरा केला पाहिजे. गणेश मूर्ती या जास्तीत जास्त दान करावे, पर्यावरण समतोल राखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी पुढे यावे, असेही आवाहन मुख्याधिकारी डॉ. चव्हाण यांनी यावेळी केले आहे.
नगरपरिषदेने स्थापन केलेल्या कृत्रिम तलावामध्ये मूर्ती विसर्जन करावे, निर्मालय नदीपात्रात न टाकता निर्मालय या कलशांमध्ये टाकावे. नदी प्रदूषण होणार नाही तसेच नदीचे पावित्र्य राखले जाईल याची दक्षता घ्यावी, असे आरोग्य विभाग प्रमुख मोहन चव्हाण यांनी सांगितले आहे.