Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nilesh Ghaywal: निलेश घायवळ मूळ पुण्यातला नाही, जामखेडमधील एका खेड्यातला; गुंडगिरी करून कोथरूडमध्ये जमवली संपत्ती, कुटुंबीय फरार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 9 October 2025, 21:30
Nilesh Ghaywal: Nilesh Ghaywal is not originally from Pune, but from a village in Jamkhed; He amassed wealth in Kothrud through hooliganism, his family is absconding

Photo-Social Media

पुणे : शहरातील कोथरुडमध्ये (Nilesh Ghaywal) गेल्या महिन्यात झालेल्या गोळीबाराच्या (Pune Crime) घटनेनंतर कुख्यात घायवळ गँग पुन्हा (Pune News) एकदा चर्चेत आली आहे. या प्रकरणानंतर गुंड निलेश घायवळ याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला. मात्र, पोलिसांचे हात त्याच्यापर्यंत पोहोचण्याआधीच तो युरोपमध्ये फरार झाला आहे. विशेष म्हणजे, गुन्हे दाखल असतानाही निलेश घायवळला पासपोर्ट कसा मिळाला, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांनी निलेश घायवळच्या कोथरुड येथील घराची झाडाझडती घेतली. त्यावेळी पोलिसांनी 2 स्कॉर्पिओ आणि काही दुचाकी वाहने जप्त केली आहेत. दुसरीकडे, आता निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याच्या बंदूक परवान्यावरूनही वादंग निर्माण झाले आहे. त्याला बंदूक परवाना कसा मिळाला, असा प्रश्न उपस्थित होत असून राजकीय वर्तुळात यावरून तापलेल्या चर्चा सुरू आहेत.

निलेश आणि सचिन घायवळ हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील आहेत. हे गाव खर्ड्यापासून सुमारे 10 किमी अंतरावर आहे. सचिन घायवळ हा पुण्यातील एका शिक्षण संस्थेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तो रोहित पवारांच्या प्रचारात सक्रीय होता. 2019 ते 2024 या काळात घायवळ बंधू रोहित पवारांसोबत दिसत होते.

 

मात्र, स्थानिक ग्रामपंचायतींसह इतर राजकीय पदांवर घायवळ समर्थकांना स्थान मिळावे म्हणून सचिन घायवळ प्रयत्नशील होता. यावरून रोहित पवार आणि घायवळ बंधू यांच्यात मतभेद झाले असल्याची चर्चा जामखेड मतदारसंघात आहे. या मतभेदांनंतर 2024 मध्ये घायवळ बंधूंनी रोहित पवारांची साथ सोडून माजी मंत्री राम शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीत त्यांनी राम शिंदेंच्या प्रचारात सहभाग घेतला होता. याचे पुरावे म्हणून काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत.

सध्या पोलिसांकडून घायवळ गँगवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. त्यामुळे घायवळ कुटुंबीय फरार झाल्याचे समजते. सोनेगाव येथीलही निलेश घायवळचे कुटुंबीय घर सोडून पसार झाले आहेत. त्याचवेळी, निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याच्यावर कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन घायवळवर बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एका बाजूला निलेश घायवळ युरोपला पळून गेलेला असताना, दुसऱ्या बाजूला सचिन घायवळ खंडणी प्रकरणी अडचणीत सापडला आहे. यामुळे घायवळ गँगविरुद्ध पोलिसांचे कारवाईचे चक्र आणखी गतीमान होण्याची चिन्हे आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post
Loni Kalbhor News: Neither fear of police nor concern of action! Matka gambling operator from Loni Kalbhor, who has multiple criminal cases, sent to Nagpur jail for one year

Loni Kalbhor News: लोणी काळभोर पोलिसांचा मटका चालकाला दणका; एक वर्षासाठी नागपूर कारागृहात रवानगी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.