पुणे : पुण्याच्या ईवायई (Ernst & Young (EY) या नामांकित अकाऊंटिंग कंपनीमध्ये 26 वर्षीय महिला कर्मचारीचा ‘कामाच्या ताणतणावामुळे (दि.20 जुलै) मृत्यू झाला होता. याची दखल आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) स्वत: हून याची दखल घेतली आहे.
एना सेबेस्टियन पेरायील असं मृत पावलेल्या तरुणींच नाव आहे.
एना पेरायीलच्या आईने नियोक्त्याला पत्र लिहून दावा केला आहे की, कंपनीत रात्री उशिरापर्यंत काम केल्यामुळे तिच्या मुलीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र कंपनीने हा आरोप फेटाळला आहे. या प्रकरणी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय तपास करत आहे.
या प्रकरणी आयोगाने म्हटले आहे की, माध्यामातील या प्रकरणी वृत्त आलेले ते सत्य असेल तर युवा पिढीला त्यांच्या कामाच्या ठिकाणी भेडसावणारी आव्हाने, मानसित ताण याचा आरोग्यावर होणारा परिणाम यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. कर्मचा-यांसोबत काम करणा-या प्रत्येकाला सन्मानाने आणि निष्पक्षतेने वागवले जाईल याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे.
जागतिक मानवी हक्क मानकांशी संरेखन सुनिश्चित करण्यासाठी त्यांचे कार्य आणि रोजगार धोरणे आणि नियम नियमितपणे अद्ययावत आणि दुरुस्ती केले पाहिजेत, यावर आयोगाने भर दिला आहे. त्यानुसार त्यांनी केंद्रिय श्रम आणि रोजगार मंत्रालयाला नोटीस बजावून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. याशिवाय, आयोगाला अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कोणती पावले उचलली जाणार आहेत हे देखील जाणून घ्यायचे आहेत.