Neera Morgaon Road | नीरा : सातारा – नगर महामार्गावरील नीरा ते मोरगाव रस्ता (Neera Morgaon Road) वाहतूकीसाठी दिवसांसाठी बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी इतर पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हा रस्ता २३ ते २७ मार्च २०२३ या दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. गुळुंचे हद्दीतील रस्त्यावरील चढ काढण्याचे काम सुरू होणार असून, नीरेकडून मोरगावकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी नीरा-जेजुरी-मोरगाव या पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे प्रशासनाने सांगितले आहे.
रस्ता मोठ्या रहदारीचा…
नीरा-मुर्टी-मोरगाव सुपे रस्ता प्रजिमा ६७ किमी ५/८५० ते ९/८५० व २१/६५० ते २४/०० मध्ये सुधारणा करणे, या कामांतर्गत किमी ६/६६० से ७/०२५ भाग गुळुंचे कर्नलवाडी हद्दीमध्ये या लांबीमधील कठीण चढाचे खोदकाम करणेचे काम या उपविभागाचे देखरेखीखाली इंडिकॉन कन्स्ट्रक्शन, सातारा रोड पुणे यांचेमार्फत प्रगतीत आहे.
या रस्त्याचे किमी ६/६६० ते ७०२५ भाग गुळुंचे कर्नलवाडी हद्दीमध्ये या लांबीतील खोदकाम करण्यासाठी दि. २३/३/२०२३ ते २७/३/२०२३ या कालावधीमध्ये रस्ता बंद करणे आवश्यक आहे. यास्तव वरील कालावधीमध्ये रस्ते वाहतुक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या रस्त्यावरील अवजड वाहने व इतर वाहतूक निरा वाल्हे जेजूरी-मोरगाव या पर्यायी मार्गाने वळवण्यात यावीत असे बुधवारी रात्री उशिरा बारामती बांधकाम विभागाने प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
नागरिकांची नाराजी…
हा रस्ता मोठ्या रहदारीचा आहे. त्यामुळे आचानक प्रशासनाने हा रस्ता वाहतूकीस बंद केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच एवढ्या घाईने आणि रात्री उशीरा पत्रक काढण्याचे नेमके कारण काय असावे असाही प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच हा रस्ता कामासाठी बंद करण्यापूर्वी किमान आठवडाभरापुर्वी परिसरातील गावांच्या ग्रामपंचायतींना व वाहतूक नियंत्रणासाठी स्थानिक पोलिसांना कल्पना देयला हवी होती.
मात्र बारामती बांधकाम विभागाने अशी कोणतीच कल्पना या रस्त्यावरील गावांना न देता गुरवारी सकाळी अचानक रस्ता वाहतूकीसाठी बंद केला. त्यामुळे स्थानिकांसह लांब पल्ल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!