Narayangoan News : पुणे : आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यानी पिकवलेले धान्य रात्रीच्या वेळी चोरून नेणाऱ्या टोळीच्या मुसक्या आळेफाटा पोलिसांनी आवळल्या आहेत. या टोळीतील ८ पैकी ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिघेजण फरार आहेत. तसेच यातील ३ आरोपी हे अल्पवयीन आहेत. (Narayangoan News)
आळेफाटा पोलिसांनी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
अनिकेत अशोक घंगाळे (वय २०) गणेश व्यंको फुलमाळी (वय १९, रा. दोघेही, राजुरी ता. जुन्नर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Nayarangav News)
मिळालेल्या माहितीनुसार, आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत शेतक-यांनी कष्ठाने पिकवलेले धान्य रात्रीचे वेळी शेतक-यांचे घराजवळुन चोरी करणा-या गुन्हेगारांची टोळी काही दिवसांपूर्वी सक्रिय झाली होती. सदर टोळीचा शोध घेणे बाबत आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी एक पथक तयार केले होते. (Narayangoan News)
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना या गुन्हयाची गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली असता सदर आरोपींनी गुन्हयामध्ये वापरलेली दुचाकी हिच्या सह एक संशयीतास राजुरी येथील गणेश डेअरी जवळुन ताब्यात घेतले.(Narayangoan News) धान्य चोरीचे गुन्हया बाबत चौकशी केली असता त्यानी सदर गुन्हयामध्ये एकुण ८ आरोपी असल्याचे सांगितले. तपास पथकाने त्यापैकी ५ आरोपींना राजुरी परीसरातुन ताब्यात घेवुन पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत घंगाळे, गणेश फुलमाळी या २ आरोपींना जुन्नर न्यायालयामध्ये हजर करून त्यांना ४ दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
दरम्यान, सदर आरोपींनी आळेफाटा पोलीस स्टेशन हददीमध्ये गुन्हा केल्याचे कबूल करून सदर दाखल गुन्हयामध्ये राजुरी व आळे येथील एकुण ८ आरोपींचा समावेश असल्याचे सांगीतले तसेच धान्य चोरीसाठी त्यांनी आळे येथील एका पिकअपचा व राजुरी येथील मोटार सायकलचा वापर केला असुन चोरीचे धान्य नगर जिल्हयात विक्री केल्याचे आरोपींनी सांगीतले. (Narayangoan News)
सदरची कामगीरी आळेफाटा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार, विकास गोसावी, प्रविण लोहोटे, सचिन कोबल, नविन अरगडे पो. मित्र निलेश शितोळे यांचे पथकाने केली आहे. (Narayangoan News)