मानसिंग पाचुंदकर (अध्यक्ष आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टी)
Nature News शिरूर : ऐन उन्हाळ्यात थंडगार सावली उन्हाच्या चटक्या पासून बचाव करत असते. (Nature News) सुर्यनारायण मात्र या काळात त्याचे गुणधर्म दाखवित असतो. (Nature News) आपन मात्र निसर्गातल्या या हालचाली बाबत लक्ष देण्यास कंटाळा करत असतो. (Nature News) निसर्गातले पक्षी देखील पावसाळा येईल म्हणून कुटूंबाची गरज म्हणून आपले घरटे सुरक्षीत ठिकाणी बांधतात. (Nature News) त्यातून त्यांना मिळणारा निवारा शोधतात. (Nature News) त्यातून त्यांचे प्रजनन होऊन कुटूंबाची व्याप्ती निसर्गाच्या नियमा प्रमाणे वाढवताना दिसतात. (Nature News)
पशुपक्षात सगळ्यात मानवाला सगळ्यात जास्त बुद्धी निसर्गाने बहाल केली आहे. मग आपन आपल्या बुद्धी चातुर्याचा फायदा निसर्ग संभाळण्याकरीता केला पाहिजे. हे मात्र तो विसरत चालला आहे. या वर्षी कडक उन्हाळ्याने जीवाची लाई लाई झाली. उष्माघाताचा परिणाम देखील मनुष्याच्या शरिरावर झालेला पहावयास मिळाला. मग पुढच्या वर्षी या तापमानात अधिक वाढ होणार आहे. हे लक्षात घेऊन या वर्षी ‘एक झाड सावली करिता’ लावले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे.
दिवसेंदिवस जागतिक तापमान वाढ होताना दिसत आहे. पृथ्वीला तापमान वाढिचा फटका सोसावा लागणार आहे. असे भाकित शास्त्रज्ञानी वर्तविले असून देखील मानव त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. जंगल तोड यामुळे सर्वाधिक फटका निसर्गाला बसला आहे. जंगले गेली अन जमीनीची धुप वाढत चालली आहे. त्यातून रासायनीक खतांनी जमिनीचा पोत गेला. त्यातून अनेक वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. या समस्यांना मानव सामोरे जात आहेत.
खरे तर कोरोना सारखा महाभयंकर रोगाला मानवाला त्यामुळे सामोरे जावे लागले आहे. या काळात मानवाला शुद्ध हवा मिळाली नसल्याने प्राण गमवावा लागला आहे. कोरोना काळात मानवाला कृत्रीम श्वासोश्वासाने जगविण्याचे काम आरोग्य विभागाने केले आहे. गेल्या दोन वर्षाच्या काळात आपल्या सभोताली अॅाक्सिजन कमी असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे प्रत्येक मानवाने झाडाचे महत्व लक्षात घेतले पाहिजे. आपल्या दैनदिन जीवनात वृक्षाला किती महत्व आहे. हे जाणवून घेतले पाहिजे.
भारतीय संस्कृतीने प्रत्येक झाडाचे महत्व समजावून सांगितले आहे. पण मानवाने मात्र ती परंपरा आहे असे समजून या परंपरेला दुर करण्याचे धाडस केल्यानेच वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याभोवती असल्याचे जाणवू लागले आहे. कधी न समजणारे व कधी न ऐकीवात असलेले रोग मानवाला गिळंकृत करत असल्याचे दिसून येत आहे.
नुकतेच लग्न समारंभ बहुतेक घरामध्ये पार पडलेला पहावयास मिळतो. या लग्नकार्यात मांडवडहाळे असाही एक संस्कृतीचा प्रकार लग्न समारंभात असतो. पण नव्याने सुरू झालेल्या या समारंभात मांडवडहाळे हा प्रकारच बंद झाल्याचे दिसून येत आहे.
मांडव डहाळे म्हणजे वेगवेगळ्या वृक्षांची फांदी या लग्न समारंभा ठिकाणि मंडप करून ठेवली जाते. त्यातून येणारे रोगराई ही या पानांमुळे पसरत नाही. त्यातून या झाडांच्या फांद्या कापल्याने त्यांना पुन्हा नवीन पालवी देखील येण्यास मदत होते. हा त्यामागिल शास्त्रीय दृष्टिकोन असतो. पण या परंपरा देखील आता काळाच्या पडद्याआड गेल्याने वृक्षाचे महत्व राहिले नाही.
या वर्षी तज्ञांनी हवामान अंदाज वर्तविला असून वेळवेर पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. पण तरिही मान्सुन लांबणीवर गेला असल्याचे चित्र आहे. हवामान अंदाज देखील चुकीचे ठरू लागले आहे. जागतिक तापमान वाढीचा परिणाम सध्या सगळीकडेच पहायला मिळू लागला आहे. यासाठी या पावसाळ्यात प्रत्येकाने आपल्याला आॅक्सीजन मिळेल व उन्हाळ्यात सावली लाभेल यासाठी एक झाड लावून जगविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
पावसाच्या सुरवातीलाच वनविभाग, कृषी विभाग देखील झाडे लावण्याची मोहिम राबवित असते. या मोहिमेत सामिल होऊन आपल्या जीवनासाठी झाडाचे महत्व इतराना सांगून ‘एक झाड सावली करिता’ या उपक्रमाचा अवलंब करा. तरच पुढच्या वर्षी उन्हाळ्यात थंडगार हवा व सावली मिळेल हे लक्षात घेतले पाहिजे.
शब्दांकन : युनूस तांबोळी