पुणे : पुण्यातील नागरिक आणि महाराष्ट्रातील नागरिक लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास करतील असे आश्वासन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणेकरांना दिले आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यातील रेसकोर्सच्या मैदानावर सभा पार पडली, यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
पुणे वासियांनी लिहून घ्या महाराष्ट्रातील माझ्या बहिणभावांनो ही मोदींची गॅरंटी आहे, की तो दिवसही आता येईल जेव्हा तुम्ही देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल, असे मोदी म्हणाले. पुणे जिल्ह्यातील चारही उमेदवार यांच्यासाठी मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे, पुण्याचे उमेदवार मुरलीधऱ मोहोळ, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी मोदींनी आज प्रचार केला.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले, आधुनिक पायाभूत सुविधांमुळं आपल्यामध्ये एक विश्वास तयार होतो. यामध्ये पुणे मेट्रो पाहा, पुणे एअरपोर्टचं नवं रुप पाहा, पालखी मार्ग पाहा, समृद्धी महामार्ग पाहा, ठिकठिकाणी जोडली जाणारी सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन्स पाहा. हे सर्व आधुनिक भारताची प्रतिमा आहे, जिवंत उदाहरण आहे.
काँग्रेसनं आपल्या १० दहा वर्षात पायाभूत सुविधांवर जितका खर्च केला यामध्ये मनमोहन सिंग यांच्या रिमोटवाल्या सरकारनं दिल्या नाहीत त्या आम्ही दहा वर्षात दिल्या. भारताच्या तरुणांनी सव्वा लाखांहून अधिक स्टार्टअप तयार केले. गर्वाची बाब ही आहे, की यांपैकी अनेक हे आपल्या पुण्यात आहेत. आम्ही रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हे जे आमचं मिशन आहे, त्याचा परिणाम आता दिसत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले
.