विशाल कदम
Narayangaon News : पुणे : नारायणगाव येथील जेसीबी ड्रायव्हरच्या खुनाचे गूढ उकलण्यास नारायणगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून घडलेल्या अर्थिक व्यावहारातुन मित्रांनीच मित्राचा खुन केल्याचे धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासात उघडकीस आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा छडा लावून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. (Police succeeded in solving the mystery of murder of JCB driver in Narayangaon)
अनैतिक संबंधातून घडलेल्या अर्थिक व्यवहारातून मित्रांनीच केला मित्राचा खू्न; आरोपी अटकेत
साहेबराव नामदेव भुतांबरे (वय ४५, रा. कोतूळ ता. अकोले जि. अहमदनगर सध्या रा. पाटेखैरेमळा नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे) असे खून झालेल्या जेसीबी ड्रायव्हरचे नाव आहे. (Narayangaon News) तर प्रियाल उर्फ बंटी गंगाराम खरमाळे (वय ३१ रा. अमरवाडी खोडद ता. जुन्नर जि. पुणे), देवराम विठठल कोकाटे (वय २७, रा. कुंभारआळी खोडद ता. जुन्नर जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव (ता. जुन्नर जि. पुणे) गावाच्या हद्दीतील खोडदरोड येथील तेलओढ्याच्या वरील बाजूस पडिक जमिनीमध्ये एका अनोळखी इसमाचा शुक्रवारी (ता.२५) मृतदेह आढळून आला होता. (Narayangaon News) याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मयताची ओळख पटवून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नारायणगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. (Narayangaon News) त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व नारायणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज
ताटे यांनी विविध पथके तयार करून सदर गुन्हयाचा तपास सुरू केला. पोलिसांनी अनोळखी मयताचा फोटो नारायणगाव परिसरामध्ये सोशल मीडियाद्वारे प्रसारित करून मयत इसमाची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला. (Narayangaon News) सदर मयताचा फोटो पाहून मयताचे नातेवाईक यांनी मयताची ओळख पटविली. त्यानंतर सदर मयताचे नाव साहेबराव भुतांबरे असल्याचे निष्पन्न झाले.
इसमाची ओळख पटल्यानंतर पोलिसांच्या तपासाला गती मिळाली. पोलिसांनी साहेबराव भुतांबरे यांच्या संदर्भात अधिक माहिती घेतली असता, भुतांबरे यांच्यासोबत २ अनोळखी इसम खोडदरोड च्या दिशेने शुक्रवारी (ता.२५) जाताना दिसले असल्याचे समोर आले. (Narayangaon News) त्यामुळे सदरच्या गुन्हयात त्याच्या सोबतच्या असलेल्या त्या २ इसमांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आलां. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही अनोळखी इसमांचा शोध लावून २४ तासाच्या आत दोघांना नारायणगाव परिसरातून अटक केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी प्रियाल उर्फ बंटी खरमाळे व देवराम कोकाटे यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, दोन्ही आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखविताच, आरोपींनी साहेबराव भुतांबरे अनैतिक यांचा अनैतिक संबंधातून घडलेल्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून खून केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. (Narayangaon News) पुढील तपास नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे करीत आहेत.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व नारायणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली (Narayangaon News) पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, धनवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, पोलीस हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकिर, राजु मोमीण, संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, कोकणे, मंगेश लोखंडे, शैलेश वाघमारे, गोरक्ष हासे, संतोष साळुंके, योगेश गारगोटे, गोकुळ कोळी, गोविंद केंद्रे आणि अरविंद वैद्य यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Junner News | जुन्नर बसस्थानकात घाणीचे साम्राज्य, प्रशासनाची डोळेझाक…
Pune Crime | दारुड्या वडिलांचा मुलाकडून डोक्यात दगड घालून खून ; मुळशीतील घटना, आरोपी अटकेत…