Muralidhar Mohol | पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बांधकाम व्यावासायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोथरुड पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संदीप पिरगोंडा पाटील, शेखर गजानन ताकवणे (वय ३५, रा. भालेकर चाळ, कर्वे रस्ता) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी आरोपी पाटील, ताकवणे यांच्या विरुद्ध खंडणी, धमकावणे, माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहोळ यांच्या मावसभावाच्या देखील नंबरचा गैरवापर…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप पाटील आणि शेखर ताकवणे यांनी त्यांच्या मोबाईलवर “कॉल मी” नावाचे एक ॲप डाऊनलोड करून त्यात भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल क्रमांक सेव्ह केला. या ॲप द्वारे समोरच्या व्यक्तीला असे भासवले गेले की हा खरंच मोहोळ यांचाच नंबर आहे. तसेच आरोपींनी मोहोळ यांच्या मावसभावाच्या देखील नंबरचा गैरवापर केला.
या दोघांनी या ॲपचा वापर करत पुण्यातील व्याव्यासिकला फोन करून भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमाला पैसे लागणार आहेत. यासाठी ३ कोटी रुपये द्या असे सांगून खंडणी मागितली.
हा सगळा प्रकार खोटा असल्याचे लक्षात येताच त्या व्यावसायिकाने पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ मोबाईल क्रमांकावरून शोध घेत आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
BJP News | गोपीचंद पडळकरांनी उध्दव ठाकरेंवर साधला निशाणा
Pune Crime | भरदिवसा कोयत्याचा धाक दाखवून पुण्यातील व्यापाऱ्याला लुटले