पुणे : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून मराठा समाज पुन्हा आक्रमक होताना दिसत आहे. जरी मराठवाड्यात त्याची तीव्रता जास्त असली तरी आता त्याचा परिणाम पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातमध्ये येत. या मराठा आंदोलनाचा फटका खासदार सुप्रिया सुळे यांना बसला. इंदापुर तालुक्यातील कांदलगाव या ठिकाणी लावण्यात आलेले त्यांचे पोस्टर्स आंदोलकांनी हटवले आहेत. जोपर्यंत राज्य सरकारकडून सगेसोयऱ्याच्या मुद्द्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांना गावात फिरू देणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
बारामती तालुका आणि परिसरातील अनेक गावांमध्ये मराठा आरक्षणासाठीच्या सगेसोयऱ्यांच्या मुद्द्याची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आधीच्या आंदोलनाचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही बसला होता. आता या आंदोलनाचा फटका सर्वच नेत्यांना बसण्याची दाट शक्यता आहे.