माळशिरस (पुणे) : श्रावणातील चौथ्या व शेवटच्या सोमवारी श्रावण यात्रे निमित्त श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे व कामिनी शेवाळे यांनी पूजा केली.
कावडींनी नेहमी प्रमाणे उत्साहात हर हर महादेवच्या गजरात मंदिरास धार घातली, यात्रे निमित्ताने सुमारे दीड लाख भाविकांनी दिवसभरात शिवलिंगाचे दर्शन घेतले.
माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने मानाची पालखी विविध रंगी फुलांनी सजवण्यात आली.मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रविवारी राञी बारा वाजता खासदार राहुल शेवाळे व कामिनी शेवाळे यांनी माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने महापुजा केली.
यावेळी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, मुंबई महानगर पालिकेच्या नगरसेविका वैशाली शेवाळे,श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण यादव उपस्थित होते.
माळशिरसचे आदर्श सरपंच महादेव बोरावके, जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय झुरंगे,पंचायत समितीच्या सदस्या सुनिता कोलते, ,युवक कॅाग्रेसचे अध्यक्ष माऊली यादव, भाजपाचे पुरंदर तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे आदींनी दर्शन घेतले. यावेळी अनेक भाविकांनी अन्नदान केले .विश्व सामाजिक संस्था आळंदी येथील स्वयंसेवकांनी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.