लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील हिंद फिटनेस येथील मोनिका संदेश काळभोर यांनी गोल्ड मेडलसह स्ट्रॉंग वूमन मास्टर्स ट्रॉफी पटकावली आहे. सबज्युनिअर 59 किलो गटात शिवराज महेश भोसले यांना गोल्ड तर जुनिअर 75 किलो वजनी गटात आर्यन गणेश काळभोर यांनी सिल्वर मेडल पटकाविले आहे.
द आयर्न गेम्स नोव्हिसेस पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे पुण्यातील वडगाव धायरी परिसरातील समृद्धी लॉन्स येथे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी हिंद फिटनेस मधील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
दरम्यान, मास्टर गटात मोनिका संदेश काळभोर, शिवराज महेश भोसले यांना गोल्ड मेडल तर आर्यन काळभोर यांनी सिल्वर मेडल पटकाविले. या सर्वांनी प्रशिक्षक परमेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेची तयारी केली होती.