पुणे (Pune): पैशाची गरज असेल आणि बॅंकेतून कर्ज भेटत नसेल तर अनेकांपुढे सावकाराकडून कर्ज घेण्याचा एकमेव पर्याय असतो. दरम्यान, कंपनी न चालल्यामुळे कर्ज बाजरी झालेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने सावकाराकडून 6 लाख रुपये कर्ज घेतले होते. तक्रारदाराने रवी पवार याच्याकडे 10 लाख रुपयाची मागणी केली होती. दरम्यान, आरोपीने बॅंकेतून 8 लाख रुपये काढून सॉफ्टवेअर इंजिनिअरला 6 लाख देत वरचे 2 लाख व्याज म्हणून कापले होते. आरोपीने तक्रार दाराकडून 6 लाखांच्या बदल्यात आत्तापर्यंत जवळपास 55 लाख 71 हजार रुपये दिले परंतु सावकार तरीही आणखी पैशाची मागणी करून सॉफ्टवेअर इंजिनिअरला जीवे मारण्याची धमकी देत होता. आरोपीने सहकाऱ्यांना घेऊन जाऊन पिडीतेला मारहाणही केली.

सावकाराच्या त्रासाला कंटाळून सॉफ्टवेअर इंजिनिअरने पौड येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पौड पोलिसांनी येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर 3 महिन्यांपासून पठाणी वसुली करणारा सावकार फरार झाला होता. आरोपीविरुद्ध 19 डिसेंबर रोजी महाराष्ट्र सावकारी अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून सावकार रवी पवार फरार होता. फिर्यादीचे एटीएम कार्ड आरोपी रवी याने स्वत:कडे ठेवले होते. पैसे फिटले की कार्ड परत करेल, असे म्हणून तो कार्ड घेऊन गेला होता. दरम्यान, मुदत दिल्यानंतरही सावकार अधिक पैशाची मागणी करत असल्याचे पाहून पिडीत सॉफ्टवेअर इंजिनिअरने पोलिसात तक्रार दाखल केली दरम्यान, गुन्हे शाखेचे अमित कांबळे यांना मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी कारवाई करत रवी पवार याला हा हडपसर इंडस्ट्रीयल एरियाजवळील कचरा डेपो समोरून पकडले आहे.







