लोणी काळभोर : पुणे जिल्ह्यात गेल्या 10 वर्षापासून इंधन चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या लोणी काळभोर येथील इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रवीण मडकंबेसह त्याच्या 11 साथीदारांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
टोळी प्रमुख प्रविण सिद्राम मडीखांबे (रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे), तूशांत राजेंद्र सुंभे (वय-31 वर्षे, रा. बैंक ऑफ बडोदाजवळ, थेऊर फाटा, ता. हवेली, जि. पुणे), रवी छोटेलाल केवट (वय 25 वर्षे, रा. बोरकरवस्ती, माळीमळा, ता. हवेली, जि. पुणे), विशाल सुरेश गोसावी (वय 30 वर्षे रा. वाणीमला थेऊर फाटा, ता. हवेली, जि. पुणे), कृष्णा ऊर्फ किरण हरीभाऊ आंबेकर (वय 31 वर्षे रा. कदमावाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे), रोहीतकुमार छेदु लाल (वय 25 वर्ष रा. बोरकरवस्ती माळीमळा, ता. हवेली, जि. पुणे), अभिामान ऊर्फ सुभाष सुरेश ओव्हाळ (वय 35 रा. पांढरी रोड, कन्याशाळेच्या मागे, लोणी काळभोर, पुणे), पांडुरंग निळकंठ नकाते (वय 42 वर्षे रा. माळीमळा, लोणी काळभोर ता. हवेली, जि. पुणे ) आकाश सुखदेव घोडके (वय 24 वर्ष रा. हनुमाननगर, कोथरुड, पुणे), तेजस तुकाराम वाघमारे (वय 23 वर्षे रा. न्यू शांतीनगर, श्रावणधारा वसाहत, कोथरुड, पुणे) शुभम सुशील भगत (वय 23 वर्षे, रा. बोरकरवस्ती, थेऊर फाटा, ता. हवेली, जि. पुणे) व टँकर मालक अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील टोळीप्रमुख प्रवीण मडीखांबे व टँकर चालक फरार आहेत. तर उर्वरित दहा जणांना अटक करण्यात आली आहे.
हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या आदेशान्वये लोणी काळभोर व मुंढवा पोलिस हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोल-डिझेल चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी मंगळवारी (ता. 10 सप्टेंबर) गस्त घालत होते. गस्त घालत असताना, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल कंपनीमध्ये पेट्रोल व डिझेल भरून टँकर पेट्रोल पंपाकडे जात असतात.
दरम्यान, कंपनीकडून टँकर प्रवास करण्याचा मार्ग, वेळ नियोजित केलेली असते. तसेच सदर टँकर कंपनीच्या बाहेर गेल्यानंतर इंधन काढता येवू नये, याकरीता टँकरला कंपनीतच लॉक करुन पाठविले जाते. असे असताना देखील कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाट्याजवळ असलेल्या तुकाराम धुमाळ यांच्या घराच्या पाठीमागे, रिकाम्या जागेत पत्र्याच्या शेडजवळ टँकर नेऊन त्यातील पेट्रोल-डिझेलची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला.
त्यावेळी पोलिसांना रिकाम्या जागेत तीन टँकर उभे असल्याचे दिसून आले. त्यापैकी एक हिंदुस्थान पेट्रोलियम व दुसरा इंडियन ऑईल कंपनीचा, तर तिसऱ्या टँकरवर कंपनीचे नाव नव्हते. थोड्या वेळाने त्याठिकाणी धुमाळ मळ्याकडून एक झेन कंपनीची चारचाकी गाडी टँकरजवळ आली. त्या गाडीतून एक इसम खाली उतरला. त्याने पाईप जोडलेली एक इलेक्ट्रिक मोटार बाहेर काढली. त्याला आडोसा करण्यासाठी दोन मोठे आयशर ट्रक पेट्रोल काढताना दिसणार नाही, अशा स्थितीत आणून उभी केली. सदर इसम टँकरमधून इलेक्ट्रिक मोटार व पाईपव्दारे डिझेल चोरी करुन एका प्लास्टिकच्या बॅलरमध्ये काढताना आढळून आला. पोलिसांनी या कारवाईत सहा जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी या छाप्यात 1620 लीटर डिझेल (अंदाजे 1 लाख 45 हजार), 3 टँकर (प्रत्येकी 10 लाख प्रमाणे), 2 आयशर (प्रत्येकी 8 लाख रुपये प्रमाणे), 50 हजार रुपये किंमतीची 1 कार व साहित्य असा 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी डिझेल या सरकारी मालाचा अपहार व चोरी केली आहे. आरोपींनी डिझेल या अत्यावश्यक व ज्वलनशील पदार्थाचा हयगयीने साठा करुन लोकांना काळ्या बाजाराने विक्री केले आहे. त्यामुळे आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात स्फोटक पदार्थ अधिनियम व विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी वरील सहाही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी इंधन चोरी करत असून ते गावातील लोकांना विकून पैसे कमावतात. तसेच सदर पेट्रोल चोरीचा अड्डा श्रीकांत ऊर्फ सोन्या राजेंद्र सुबे यांच्या मालकीचा असल्याचे सांगून प्रविण सिद्राम मडीखांबे (रा. संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) आणि त्याचे इतर साथीदार पेट्रोल चोरीमध्ये मार्गदर्शन व मदत करत आहे. सदर पेट्रोलचे टँकर इंधन माफिया प्रविण मडीखांबे व त्याच्या साथीदारांच्या मदतीने विक्री करुन त्याचा मोबदला आपआपसात वाटुन घेत असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
लोणी काळभोर येथील इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रविण मडीखांबे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. त्याने बेकायदेशीर कृत्य चालु ठेऊन संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संयुक्त गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला आहे. सदर टोळीने मागील 10 वर्षात पेट्रोल डिझेल चोरीचे गुन्हे पुन्हा पुन्हा केलेले आहेत. त्यांच्या या कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या टोळीवर कायद्याचा वचक बसावा म्हणून लोणी काळभोर पोलिसांनी टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२), ३/४) या अन्वये कारवाई करण्यात यावी. असा प्रस्ताव तयार केला होता.
लोणी काळभोर पोलिसांनी हा प्रस्ताव परिमंडल 5 चे पोलीस उप-आयुक्त आर. राजा यांच्यामार्फत पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील यांनी मान्यता देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5 आर. राजा, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र करणकोट, मुंढवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक अमोल घोडके, पोलिस हवालदार रामहरी वणवे, पोलीस अंमलदार मंगेश नानापुरे, मल्हार ढमढेरे, शिवाजी जाधव, संदीप धुमाळ, बाजीराव विर, योगेश पाटील यांच्या पथकाने केली आहे.