संदीप टूले
MLA Rahul Kul : दौंड, (पुणे) : बारामती तालुक्यातील जळगाव सुपे, येथील नागरिक अंबादास येडे यांच्यावर खुब्याची शस्त्रक्रिया करायची होती. त्यासाठी डॉक्टरांनी त्यांना जवळपास 8 लाखांचा खर्च येईल, असे सांगितले. या खर्चाचा आकडा ऐकून येडे यांना काहीच सुचेना कारण येणारा खर्च अंबादास येडे यांना पेलवणारा नव्हता. त्यामुळे त्यांनी थेट दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याकडे मदतीची साद घातली. त्यावेळी आमदार कुल यांनी त्यांना मदतीचे आश्वासन देत ते पूर्णही केले. (MLA Rahul Kul)
आमदार कुल यांनी अंबादास येडे यांना मुंबईतील एका नामांकित रुग्णालयामध्ये दाखल करवून संपूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करून दिली. त्यामुळे येडे हे आमदार राहुल कुल यांच्या जनता दरबारावेळी राहू येथे भेटण्यासाठी व आभार व्यक्त करण्यासाठी आले होते.
यावेळी आमदार कुल यांनी यांच्या तब्बेतीची विचारपूस करून त्यांना उत्तम प्रकृतीबाबत शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील काळात काही मदत लागली तर नक्की सांगा असा आधारही दिला. MLA Rahul Kul)