बापू मुळीक / सासवड : पुरंदर तालुक्यात अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून सोलर पंपासाठी 250 कोटी रुपये, सासवड नगरपालिकेसाठी 12. 50 कोटी, जेजुरीसाठी 72 कोटी, नारायणपूरसाठी 12 कोटी, पुरंदर उपसा सिंचनसाठी 52 कोटी रुपये या रक्कमा फक्त अजित पवार यांच्या माध्यमातून मिळाल्या असल्याचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी सांगितले. महायुतीचे उमेदवार संभाजी झेंडे यांच्या सभेच्या प्रचारार्थ सांगता सभेत ते बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले, सासवड ते सुपा रोडसाठी देखील निधी दिला आहे. सीनियर कॉलेज जर बंद झाले, तर आपली मुले उच्च शिक्षितसाठी कुठे पाठवायची, याचा विचार करावा. त्यासाठी स्वतः अजित पवार हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत. चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विज बिल माफी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, सातबारा हा कोरा केला जाईल, लाडकी बहीण योजना, अशा विविध योजनांचा लाभ या अजित पवार यांच्या माध्यमातून मिळाला.
क्रिकेटच्या टीम सारखे कोण चौकार, षटकार, एकेरी धाव, दुहेरी धाव, तिहेरी धाव, बॉलर, कीपर, फील्डिंग, बॅट्समन असे सध्या पुरंदर विधानसभामध्ये चालू आहे. आरोप प्रत्या आरोप यांच्या फैरी चांगल्याच रंगलेल्या आहेत. पुरंदर धार्मिक, पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी कॅप्टन म्हणून संभाजी झेंडे यांना मतदान स्वरूपातून आमदार म्हणून विधानसभेत पाठवावे, असे वक्तव्य डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केले.