हनुमंत चिकणे
MLA Ashok Pawar News : उरुळी कांचन, (पुणे) : कमी जास्त दाबामुळे मागील एक ते दीड महिन्यापासून विजपुरवठा विस्कळीत होत आहे. महावितरणच्या या गोंधळामुळे पूर्व हवेलीतील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणने विजपुरवठा सुरळीत नाही केला तर महावितरणच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दिला आहे. (MLA Ashok Pawar will protest against Mahavitaran if electricity supply is not made smooth)
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित पुणे परिमंडळ या ठिकाणी आमदार अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखालीबैठकीचे आयोजन सोमवारी (ता. ०५) करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महावितरनच्या अधिकाऱ्यांना हा इशारा दिला आहे.
यावेळी महावितरण मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड, उरुळी कांचन येथील उपकार्यकारी अभियंता प्रवीण महामुळकर, माजी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, माजी सभापती आप्पासाहेब काळभोर, माजी उपसभापती सनी काळभोर, उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे सदस्य भाऊसाहेब कांचन, प्रवक्ते विकास लवांडे, हिंगणगावचे सरपंच थोरात, विविध महावितरणचे अधिकारी, पूर्व हवेलीतील पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते. (MLA Ashok Pawar News)
उरुळी कांचन उपविभागात लोणी काळभोर, कदमवाकवस्ती थेऊर, कुंजीरवाडी, उरुळीकांचन ही प्रामुख्याने गावाचे नागरीकरणाने झपाट्याने वाढत असताना वीजेच्या नियमित मागणीचा प्रश्न या ठिकाणी सुटत नसल्याने वीजेचा खंडीतपणा वाढला आहे. (MLA Ashok Pawar News) या भागात वीजेच्या अतिरिक्त मागणी व पर्यायी वीज साठवणूकीला पर्याय नसल्याने वीज वाहिन्या, सब स्टेशनमध्ये यांत्रिक बिघाडा ने पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार घडत आहे. भर उन्हाळ्यात तर वीजेचा खंडीतपणाने नागरीक अक्षरशः हौराण झाले आहे.विजेचा अतिरिक्त भार निर्माण होत असल्याने वीजेचा खंडीतपणा वाढला आहे.
या भागात शेतीसिंचनासाठी वीज पुरवठा अखंडित असल्याने वीजेचा मोठा भार या ठिकाणी आहे. याबाबत वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. याबाबत पूर्व हवेलीतील नागरिकांनी वारंवार आमदार पवार यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. (MLA Ashok Pawar News) या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आमदार अशोक पवार यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आमदार पवार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना उपोशानाचा इशारा दिला आहे.
दरम्यान, उरुळी कांचन उपविभागात २३ गावांतील वीज पुरवठा प्रश्न सोडविण्यात महावितरणला अपयश आल्याने या ठिकाणी दिवसेंदिवस येथील वीजेचा खंडीतपणा बिकट होऊ लागला आहे. (MLA Ashok Pawar News) या ठिकाणी वीजेच्या खंडीतपणाने शेतकरी, व्यवसायिक अत्यंत हैराण झाले आहेत. महावितरनने पुरंदर उपसा योजनेतून वीज पुरवठ्यासाठी शिंदवणेतून कृष्णा खोरे महामंडळाकडून वीजेचा पुरवठा मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. मात्र तो प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.
५ वर्षापासून अतिरिक्त वीज उपकेंद्र निर्माण करण्याची मागणी..
पूर्व हवेलीतील महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागात वीजेची वाढती मागणी तसेच स्थिर दाबाचा वीज पुरवठा उपलब्ध होत नसल्याने गेल्या ५ वर्षापासून सातत्याने या ठिकाणी अतिरिक्त वीज उपकेंद्र निर्माण करण्याची मागणी होत आहे. (MLA Ashok Pawar News) परंतु जागेचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने वीज उपकेंद्राचा प्रश्न जैसे थे आहे. तर दुसरीकडे या भागात विजेचा अतिरिक्त भार निर्माण होत असल्याने वीजेचा खंडीतपणा वाढला आहे. याबाबत वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत.
शेतीला दिवसा विजपुरवठा करा..
पूर्व हवेलीत मागील काही दिवसांपूर्वी उसाच्या शेतात बिबट्या व त्यांची पिल्ले दिसून आली आहेत. त्यामुळे शेतात काम करणारे मजूर व शेतकरी रात्रीच्या वेळी शेतीसाठी पाणी देणारे शेतमजूर, शेतकरी यांना बिबट्यापासून भीती वाटत आहे. (MLA Ashok Pawar News) याची दखल घेऊन “महावितरण’ने सर्व कृषिपंपांसाठी सकाळी विजपुरवठा करावा अशी मागणीही आमदार पवार यांनी केली. नागरिक आकडे टाकून वीज वापरीत आहे तर महावितरणकडून घरोघरी जाऊन जनजागृती करा असे उपक्रम राबवा असेही पवार म्हणाले.
Uruli Kanchan News : कोरेगाव मूळ येथील अमर एज्युकेशन इनस्टीटयूटचे विद्यार्थी शंभर नंबरी..
Uruli Kanchan : सोरतापवाडी येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९४.५२ टक्के