Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MIT News : फॅशन केवळ डिझाईन नाही, तर तुमची ओळख – संतोष कटारिया

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 2 May 2026, 18:02

MIT News  पुणे, ता. 2 : फॅशन म्हणजे केवळ डिझाईन नव्हे, तर ती आपली ओळख असते. आपण केलेल्या प्रत्येक डिझाईनद्वारे जगाला त्यांच्या संस्कृतीची, वेशभूषेची एक कथा सांगितली जाते. त्यामुळे स्वतःच्या कल्पनांशी कायम प्रामाणिक राहा, सातत्याने नवकल्पना करत राहा आणि जगाला आणखी सुंदर बनवा, असे मत पेपरमिंट क्लोदिंग प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक संतोष कटारिया यांनी मांडले. MIT News

ते एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (आयओडी)च्या फॅशन विभागाचा ११ वा वार्षिक ग्रॅज्युएशन फॅशन शो (जीएफएस) २०२६ निमित्ताने बोलत होते. याप्रसंगी ‘ग्लॅड यू केम अँड ग्लॅड वी मेट’चे संस्थापक मॅडी अमृतकर, सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर टीना रांका, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. नचिकेत ठाकूर, प्रा. डॉ. दांडेश्वर बिसोई, तसेच फॅशन डिझाईन विभाग प्रमुख डॉ. अर्शिया कपूर आदी उपस्थित होते. MIT News

या फॅशन शोमध्ये २०२२–२०२६ या बॅचमधील बी.डिझ. फॅशन कम्युनिकेशन, बी.डिझ. फॅशन डिझाईन आणि एम.डिझ. फॅशन मॅनेजमेंट व मार्केटिंग या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांनी डिझाईन कलेक्शन्स, फॅशन फिल्म्स, प्रकाशने आणि ब्रँडिंग प्रोजेक्ट्स सादर केले. प्रत्येक सादरीकरणातून विद्यार्थ्यांची वैयक्तिक डिझाईन ओळख आणि व्यावसायिक तयारी स्पष्टपणे दिसून आली.

यावेळी संतोष कटारिया यांनी बाजारपेठेचे आकलन आणि ग्राहकांची गरज समजून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच सर्जनशीलतेसोबत व्यावसायिक दृष्टीकोन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मॅडी अमृतकर यांनी विद्यार्थ्यांना मजबूत नेटवर्क तयार करण्याचा, सहकार्याला प्राधान्य देण्याचा आणि डिजिटल ओळख निर्माण करण्याचा सल्ला दिला. MIT News

 

विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थित पालक व डिझाईन क्षेत्रातील विविध व्यावसायिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एमआयटी एडीटीचा ग्रॅज्युएशन फॅशन शो हा उदयोन्मुख डिझायनर्ससाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत असून, त्यांच्या व्यावसायिक प्रवासाची भक्कम सुरुवात असल्याचे मतही उपस्थितांनी मांडले. MIT News

वेषभूषा ओळखीची प्रभावी भाषा – डॉ. मंगेश कराड
वेषभूषा ही केवळ बदलत्या ट्रेंड्स किंवा फॅशनपुरती मर्यादित नसून ती व्यक्तिमत्त्वाची प्रभावी अभिव्यक्ती आहे. आपण काय परिधान करतो यावरून आपल्या संस्कृती, मूल्ये, व्यक्तिमत्त्व आणि भावनांचे दर्शन घडते. सौंदर्यापलीकडे जाऊन वेषभूषा अर्थ आणि आठवणी जपते, ज्यामुळे व्यक्ती स्वतःकडे कसे पाहतात आणि इतर त्यांना कसे पाहतात, हे ठरते. अशा प्रकारे वेषभूषा ही ओळखीची एक मूक पण प्रभावी भाषा ठरते, जी वैयक्तिक असली तरी सर्वांना समजणारी आहे, असे प्रा.डाॅ.मंगेश कराड यांनी यावेळी व्यक्त केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिंपळवंडीतील बालिकेवर अत्याचार-हत्या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पीडित कुटुंबाची भेट; प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार

Thursday, 27 August 2026, 22:55

पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यू अन् स्वाईन फ्लूचा विळखा तीव्र; अवघ्या २५ दिवसांत नोंदवले गेले तब्बल २०५ रुग्ण

Thursday, 27 August 2026, 22:36

अखेर पुणेकरांची प्रतिक्षा संपणार! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कधी धावणार? तारीख ठरली; प्रशासनाची धावपळ

Thursday, 27 August 2026, 22:18

लोणी काळभोर येथील अट्टल गुन्हेगार राज पवार एक वर्षासाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध

Thursday, 27 August 2026, 21:53

सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा! उष्णता वाढणार अन् पावसाची तूट निर्माण होणार; हवामान तज्ज्ञांचा इशारा

Thursday, 27 August 2026, 21:32

भिगवणच्या अशोक लॉजमध्ये वेश्यागमन? नागरिकांमधून संताप व्यक्त; पहा व्हायरल Video

Thursday, 27 August 2026, 20:39
Next Post

Pune Drug News : कोंढव्यात ‘ड्रग्ज माफिया’वर पोलिसांचा मोठा प्रहार; २२ किलो गांजासह महिला-युवक जेरबंद, साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp