Saturday, May 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Drug News : कोंढव्यात ‘ड्रग्ज माफिया’वर पोलिसांचा मोठा प्रहार; २२ किलो गांजासह महिला-युवक जेरबंद, साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 2 May 2026, 18:27

Pune Drug News कोंढवा, ता. 2 : पुणे शहरात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून कोंढवा परिसरात गांजाच्या अवैध विक्रीवर पोलिसांनी मोठा घाव घातला आहे. तब्बल २२ किलो गांजासह महिला व युवकाला अटक करण्यात आली असून सुमारे ९.७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. Pune Drug News

पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई सुरू असताना परिमंडळ ०५ च्या पोलीस उप आयुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही धडक कारवाई केली. २९ एप्रिल रोजी पेट्रोलिंगदरम्यान पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई उभी राहिली. Pune Drug News

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा खुर्द येथील शिवनेरीनगर परिसरातील गल्ली क्रमांक ३० मध्ये गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार परिमंडळ ०५ पथक आणि कोंढवा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने नियोजनपूर्वक छापा टाकला. Pune Drug News

छाप्यात यास्मीन करीम शेख (वय ४५) आणि आमिर समीर शेख (वय १९) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून २१.१९८ किलो गांजा (बिया-बोंड्यासह), रोख रक्कम, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण ९,७४,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२८/२०२६ नुसार एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(क) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप करत आहेत.

ड्रग्जविरोधात पोलिसांची आक्रमक मोहीम
पुणे शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सततच्या छापेमारी व कारवायांमुळे ड्रग्ज नेटवर्कवर दबाव वाढत असून अशा कारवायांमुळे अवैध धंद्यांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या कारवाईमुळे कोंढवा परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख, रविंद्र गावडे, पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, सर्फराज देशमुख, कैलास सपकाळ, हणमंत कांबळे, पुजा चोरमले, विशाल मेमाणे, अमोल हिरवे, स्वागत पळसे, अमित सुर्यवंशी, पुजा नागरगोजे, शंकर माटे, आर्या सांळुके, सिध्देश झेंडे, दत्तात्रय धुमाळ यांच्या पथकाने केली आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

इराण-अमेरिका युद्धामुळे भारतात महागाईची “दुसरी लाट” येणार! आरबीआयचा देशाच्या अर्थव्यवस्थेला धोक्याचा इशारा

Friday, 22 May 2026, 23:01

पुण्यात कौटुंबिक वादातून मुलाचा अजब कारनामा! वडिलांच्या मित्राची रिक्षा चोरून फरार; गुन्हा दाखल

Friday, 22 May 2026, 22:13

नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून मोठी अपडेट! एनटीएची “फिजिक्स” तज्ज्ञ मनीषा हवालदार सीबीआयच्या जाळ्यात

Friday, 22 May 2026, 21:21

कोंढवा, हडपसर जलमय; वाडकर मळ्यातील रस्ते पाण्याखाली! पहिल्याच पावसात पुणे महापालिकेचं “कागदी” नियोजन चव्हाट्यावर

Friday, 22 May 2026, 20:41

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कामशेत बोगद्यात एकाच वेळी दोन मोठे अपघात! निसरड्या रस्त्यामुळे गाड्या घसरल्या; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Friday, 22 May 2026, 20:09

‘सांग माझी बायको कुठे आहे’ पुण्यात दारुपार्टीत दोन मित्रांमध्ये वाद; रागाच्या भरात बियरच्या बाटलीने मित्रावर हल्ला

Friday, 22 May 2026, 19:27
Next Post

Pune Crime News : नसरापूरनंतर चाकण हादरले; तीन वर्षीय चिमुरड्यावर अत्याचार करून हत्या, १६ वर्षीय आरोपी अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.