पिंपरी : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी (दि. ३०) रात्री साडेआठ वाजता आळंदी-चाकण ग्रेडवर कुरुळी येथे करण्यात आली. पोलीस अंमलदार रणधीर माने यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी-चाकण रोडवर कुरुळी येथे एक अल्पवयीन मुलगा पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सरू आहे