सासवड : भिवरी (ता.पुरंदर ) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी म्हस्कू राजाराम कटके व व्हाईस चेअरमन पदी अशोक शिवाजी जगदाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन भाऊसाहेब बबन दळवी व व्हाईस चेअरमन केरबा शंकर शेलार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागी या निवडी करण्यात आल्या आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे यांनी काम पाहिले. भिवरी ग्रामपंचायती प्रमाणेच चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड सलग सत्तावीस वर्ष बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहिली आहे.
भिवरी (ता.पुरंदर ) येथील श्री भैरवनाथ मंदिरात भिवरीकर मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते म्हस्कू कटके व अशोक जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भिवरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळ भाऊसाहेब बबन दळवी, धोंडीबा सीताराम कटके, किरण शांताराम कटके, केरबा शंकर शेलार, सुनील रामदास गोफणे, श्रीपती यशवंत वाडकर, नंदा सर्जेराव येवले, केशव रामचंद्र घाटे, वंदना प्रकाश चौधरी, सचिव अमोल फडतरे उपस्थित होते.
सदर निवडप्रसंगी भिवरी गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध मंडळे, संस्था, संघटना, पक्ष यांच्या पदाधिकाऱ्यांसह भिवरीकर ग्रामस्थ उपस्थित होते. सोसायटीच्या माध्यमातून पारदर्शी कारभार करुन शेतकरी सभासदांना चांगली सेवा देणार असल्याचे निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन म्हस्कू कटके व व्हाईस चेअरमन अशोक जगदाळे यांनी सांगितले. प्रास्तविक सखाराम कटके व शेखर कटके यांनी केले. सुञसंचालन माऊली घारे यांनी केले. आभार सचिन दळवी यांनी मानले.