दौंड : पाटस (ता. 28) येथील श्री. नागेश्वर विद्यालयात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात शाळेतील विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पाटस येथील श्री. नागेश्वर विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती उत्सव विविध उपक्रमांनी नुकतीच साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल कुल यांना आमंत्रित करण्यात आले होते. विद्यालयात आमदार राहुल कुल यांच्या हस्ते डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
डॉ.कर्मवीर जयंतीचे औचित्य साधून विद्यालयात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा पार पडल्या. निबंध स्पर्धेत मोठ्या गटात पुनम तानाजी चव्हाण (नववी ब) तर लहान गटात आरोही दीपक भंडलकर (7 ब ), वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात, अक्षदा तुकाराम जाधव (8 अ) प्रथम तर लहान गटात कुलसुम जावेद बागवान (5 ब), रांगोळी स्पर्धेत मोठ्या गटात प्रज्ञा राजेंद्र झेंडे (दहावी अ) प्रथम क्रमांक तर लहान गटातून हर्षदा स्वप्निल दळवी (6 अ) तसेच चित्रकला स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम क्रमांक पटकावला, माहीम अजीम बागवान (10 अ) आणि लहान गटात मानसी सुरज कोल (6 अ)

या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे यावेळी आमदार कुल आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच शाळेला विविध माध्यमातून मदत करणाऱ्या माजी विद्यार्थ्यी तसेच देणगीदारांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
दरम्यान, प्रमुख वक्ते विकास जाधव यांनी आपल्या पहाडी आवाजात डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनपट आपल्या शब्दातून व्यक्त केला. उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाटसह त्यांना दाद दिली. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी संजय मोहिते, माजी सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार, साधना विद्यालयाचे माजी प्राचार्य विजय शितोळे, नागेश्वर विद्यालयाचे प्राचार्य आबासाहेब खारतुडे पर्यवेक्षक संजय भोसले आदी उपस्थित होते.







