संदीप टूले
Kedgaon: केडगाव : दौंड तालुक्यातील एकेरीवाडी ग्रामपंचायत अंतर्गत डेंग्यू, मलेरिया सदृश्य पार्श्वभूमीवर संपूर्ण गावात जंतूनाशक औषधाची फॉगिंग मशिनद्वारे फवारणी गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहे.
दौंड तालुक्यात अनेक गावांमध्ये डेंग्यू, मलेरिया आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. नागरिकांमध्ये आपल्या कुटुंबाच्या आरोग्याबाबतची भीती पसरली असल्यामुळे एकेरीवाडी गावात युद्धपातळीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून धूर फवारणी करण्यात येत आहे. डेंग्यू, मलेरिया डास प्रतिबंधात्मक उपाय करणे फार गरजेचे झाले असून, डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण हे इतरही शेजारील गावांनी झपाट्याने वाढले आहेत. या डेंग्यू, मलेरिया डास प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एकेरीवाडी ग्रामपंचायतने औषधाची फॉगिंग मशिनद्वारे केली गावातील संपूर्ण वाडी वस्तीवर पोहचून हे ग्रामपंचायतीचे कर्मचारी जंतुनाशक धूर फवारणी करत आहे.
तसेच डासांच्या नियंत्रणासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाने योग्य पाऊले उचलत फॉगिंग मशीनच्या माध्यमातून धुरळणी करण्यात येत आहे. या फॉगिंगमुळे रोगाचा प्रार्दुभाव कमी होऊन नागरिकांना याचा नक्कीच फायदा होईल.
फॉगिंग ही निर्जंतुकीकरणाची एक आवश्यक पद्धत आहे, जी रोगजनकांच्या निर्मूलनासाठी आणि वैद्यकीय उपकरणांच्या सुविधांमध्ये संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे गावात प्रथम निर्जंतुकीकरण करणे फार गरजेचे आहे. म्हणून आम्ही अशी काही परिस्थिती जाणवली की लगेच फॉगिंग करून घेतो.
– नीलकंठ गायकवाड, ग्रामसेवक, एकेरीवाडी