Marathi Serial TRP : पुणे: मराठी मालिकाचा आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. मराठी मालिका विश्वात नेहमी नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. काहींवर त्याचा चांगला परिणाम होतो. तर काहींवर त्याचा वाईट परिणाम होतो.
मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे, निर्मात्यांचे, टीव्ही चॅनलचे लक्ष असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. त्याचा परिणाम मालिकेवर होतो. सध्या अभिनेत्री जुई गडकरीच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेला नेहमीप्रमाणे सर्वात जास्त पसंती मिळाली आहे. या आठवड्यातही टीआरपीच्या शर्यतीत ‘ठरलं तर मग’ या मालिकेने 6.9 रेटिंगसह बाजी मारली आहे. तर, दुसऱ्या नंबरवर तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे. तिसऱ्या क्रमांकावर ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका आहे. या मालिकेला 6.4 रेटिंग मिळाले आहे.
चौथ्या क्रमाकांवर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत असून या मालिकेला 6.4 रेटिंग मिळाले आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका 6.0 रेटिंगसह टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर आहे. टीआरपी लिस्टमध्ये ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सहाव्या स्थानावर आहे. या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे. टीआरपीच्या शर्यतीत सातव्या स्थानावर ‘कुन्या राजाची गं तू रानी’ ही मालिका 5.6 रेटिंगसह आहे. आठव्या क्रमांकावर ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत 4.0 रेटिंगसह आहे. टीआरपीच्या शर्यतीत ‘आता होऊ दे धिंगाणा 2’ हा कार्यक्रम नवव्या क्रमांकावर आहे. या कार्यक्रमाला 3.6 रेटिंग मिळाले आहे. दहाव्या क्रमांकावर ‘शुभविवाह’ ही मालिका 3.5 रेटिंगसह टीआरपीच्या शर्यतीत आहे.