Maratha Vanvas Yatra : लोणी काळभोर : मराठा आरक्षणासाठी तुळजापूर ते मुंबई मंत्रालय अशी निघालेल्या मराठा वनवास यात्रेवर फुलांचा वर्षाव करून उरुळी कांचन, लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती येथे २३ मे रोजी जोरदार स्वागत करण्यात आले आहे. (At Uruli Kanchan, Loni Kalbhor along with Kadamwakwasti Maratha Vanvas Yatra received a warm welcome)
यावेळी मराठा वनवास यात्रेचे संयोजक योगेश केदार, प्रताप सिंह कांचन, सुनील नागणे, प्रिंट व मेडीया डिजिटल पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर, हवेली पंचायत समिती माजी उपसभापती युगंधर काळभोर, लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, शिवसेना जिल्हा संघटक निलेश काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, संतोष भोसले, अमित काळभोर, उमेश काळभोर, नामदेव जंजिरे, दिग्विजय काळभोर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Maratha Vanvas Yatra )
आरक्षण मिळत नाही तोपर्यत मंत्रालय सोडणार नाही; वनवास यात्रा संयोजकांचा इशारा
यावेळी बोलताना योगेश केदार म्हणाले की, आकडेवारीचा महाघोटाळा काही नेते मंडळीनी केल्याने आजमितीला मराठा समाजाला आरक्षणासाठी वनवास भोगावा लागत असून मराठा समाजाला ओबीसी मधून ५० टक्क्याच्या आत आरक्षण मिळत नाही. तोपर्यत मंत्रालय सोडणार नाही असा इशारा योगेश केदार यांनी राज्यकर्त्यांना दिला आहे. (Maratha Vanvas Yatra )
अठराव्या दिवशीचा मुक्काम लोणी काळभोर येथे करण्यात आला होता. २४ मे रोजी सकाळी ७ वाजता पुढे मुंबईच्या दिशेने रवाना झाली.
प्रभू श्रीराम यांना केवळ चौदा वर्षेच वनवास भोगावा लागला परंतु देश स्वतंत्र झाला तेव्हापासून मराठा समाजाचा आरक्षणाच्या बाबतीत वनवास सुरू आहे. तो वनवास मिटावा यासाठी आम्ही मराठा वनवास यात्रा काढली आहे. ५०% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण घेतल्याशिवाय मराठे मुंबई सोडणार नाहीत, असे वनवास यात्रेचे केदार यांनी सांगितले आहे.
दरम्यान, मराठा वनवास यात्रेच्या माध्यमातून गावोगावी संविधान आणि मराठा समाजाला ओबीसी आरक्षण कसे देता येईल..? याबाबत जनजागृती करत ही यात्रा मार्गक्रमण करत आहे.
मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे. यासाठी तुळजापूर ते मुंबई असा जवळपास ५०० किलोमीटरचा पायी प्रवास करत ही वनवास यात्रा निघाली आहे. ६ मे रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी यात्रेचे तुळजापूर येथून प्रस्थान झाले व ६ जून राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी ही मराठा वनवास यात्रा मुंबईवर धडकणार आहे. (Maratha Vanvas Yatra )
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील एका २० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या