राजेंद्रकुमार शेळके
Manjari News | पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळाचे मतदार जनजागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. आर. व्ही. पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.रवींद्र मोजे यांना उत्कृष्ट नोडल ऑफिसर व राष्ट्रीय सेवा योजनेचे सेक्रेटरी आशिष जगनाडे व रासेयो स्वयंसेवक वैजनाथ पंचाक्षरी, शेखर पवार, स्वरांजलि मुळे,सिद्धेश लिमकर, अनिकेत खेडकर, निखिल शिंदे,आदेश गिरी यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून सन्मानित करण्यात आले.
डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण समारंभ….
दरम्यान, महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे प्रमुख डॉ.श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते व पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्रबोधन कार्यशाळा, मतदार जागृती, मतदार नोंदणी, मतदार जागृती रॅली, मतदार जागृती घोषवाक्य स्पर्धा, मतदार जागृती पोस्टर स्पर्धा, पथनाट्य, लोकशाही भिंत, मतदार जागृती शपथ, बक्षीस वितरण असे विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही.पाटील, संदीप टिळेकर उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune News | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सव