बारामती : पिंपळी-लिमटेक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मंगल खंडू खिलारे यांची शुक्रवारी (ता. 20) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंच अश्विनी सुनिल बनसोडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांच्या अध्यक्षतेखाली पिंपळी ग्रामपंचायत कार्यालयात हि निवडणूक प्रक्रिया पार पडली.
या निवडणुकीत मंगल खिलारे यांचा एकमेव अर्ज आल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी मंगल केसकर यांनी मंगल खिलार यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली. ग्रामविकास आधिकारी बाळासाहेब भोईटे यांनी निवडणूकीचे कामकाज पाहिले. खिलारे यांची निवड होताच, ग्रामपंचायतीच्या वतीने पुष्पहार व नारळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांचा देखील गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी रमेश ढवाण, संतोषराव ढवाण, आबासाहेब देवकाते, अशोकराव ढवाण, ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब देवकाते, सदस्या स्वाती ढवाण, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडियाचे उपाध्यक्ष सुनिल बनसोडे, अशोकराव ढवाण, सरपंच मंगल केसकर, उपसरपंच अश्विनी बनसोडे, राहुल बनकर, अजित थोरात, कोमल टेंबरे, आनंद निंबाळकर, ग्रामपंचायत कर्मचारी अनिल बनकर, बाळासो बनसोडे, प्रसन्ना थोरात, महादेव खोमणे, सतीश शिंदे, बबलू खंडाळे आदींसह खिलारे परिवारातील सदस्य व पिंपळी-लिमटेक येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
नवनिर्वाचित उपसरपंच मंगल खिलारे निवडीनंतर म्हणल्या, “गावच्या सर्वागिण विकास कामासाठी सरपंच – ग्रामपंचायत सदस्य आम्ही सर्व जण प्रयत्न करु तसेच येणाऱ्या भविष्यकाळात मला मिळालेल्या पदाचा विकासकामे करत असताना नागरिकांनी सहकार्य करावे.”