Manchar News : मंचर (पुणे ) : भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत देवदर्शनासाठी पायी चाललेल्या 95 वर्षीय वृद्ध नागरिकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील चौकात गुरुवारी (दि. 29) सकाळी 9 वाजता घडला.
राजाराम विश्वनाथ रोकडे (रा. वाळुंजनगर, ता. आंबेगाव) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. खडकवाडी चौकात ते आले असताना पाठीमागून येणार्या डंपर (एमएच 14 डीएम 6450)ने रोकडे यांना धडक दिली.
देवदर्शनासाठी जाताना काळाने केला घात
मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम रोकडे हे दररोज खडकवाडी येथे देवदर्शनासाठी जात असत.(Manchar News) गुरुवारीही सकाळी ते नेहमीप्रमाणे देवदर्शनासाठी निघाले होते.
या अपघातात डंपरची चाके त्यांच्या दोन्ही पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी मंचर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. (Manchar News) मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
पारगाव पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून, डंपरचालक फक्कड शेट्टे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Manchar News) राजाराम रोकडे हे जुन्या पिढीतील गाव कारभारी होते. त्यांनी वाळुंजनगर ग्रामपंचायतचे सदस्यपद दोनवेळा भूषवले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे. निवृत्त तलाठी शिवाजी रोकडे यांचे ते वडील होत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Manchar News : आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे हल्ला सत्र सुरुच ; पाच ठिकाणी हल्ला, वासरू ठार
Manchar News : निवृत्त पोलिसाची हत्या करणाऱ्या आरोपीला २४ तासाच्या आत मंचर पोलिसांनी ठोकल्या बेड्या