पिंपरी: ग्राहकाकडून आलेले ४४ लाख ७२ हजार ८१९ रुपये परस्पर स्वतःच्या बँक खात्यावर घेत बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केली. या प्रकरणी शनिवारी (दि. १२) दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जय विलास राऊत (वय २८. रा. धानोरी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाय आहे. धिरेंद्र ईश्वरलाल पटेल (वय ४१, रा. हडपसर, पुणे) असे फसवणूक झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ऑगस्ट २०२२ ते १२ एप्रिल २०२५ या कालावधीत डुडुळगाव येथे वसुंधरा सोसायटीच्या ग्रे स्टोन वेंचरच्या कार्यालयात घडली. आरोपी हा पटेल यांच्या कार्यालयात काम करीत होता. त्यावेळी आरोपीने ग्रे स्टोन वेंचरच्या नावाने येणारे ४४ लाख ७२ हजार ८१९ रुपये आपल्या वैयक्तिक बँक खात्यात घेतले. त्याच्या बनावट पावत्या, खोटे इंडेक्स टू डिमांड लेटर, नो ड्यूस लेटर तसेच सदनिकेचे पझेशन फिर्यादी यांच्या परस्पर खरेदीधारकांना देवून फसवणूक केली. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.