पिंपरी : ऑफिसमध्ये दारू पिऊन आलेल्या एका कामगाराने ऑफिसमध्ये उलटी केली. त्यामुळे त्याला हटकणाऱ्याला साथीदाराच्या मदतीने बेदम मारहाण केली. या प्रकरणी मंगळवारी (दि.८) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विजय गजानन मिसाळ (वय ४२ कुरुळी, खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शरद थोरवे (वय. २१), अमोल (पूर्ण नाव माहिती नाही, दोघे रा. कुरुळी, खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कुरुळी गावातील डीएमआरओ वॉटर प्लांटच्या ऑफिसमध्ये घडली. फिर्यादी विजय हे त्यांच्या कामावर असताना ऑफिसमध्ये दारू पिऊन आलेल्या आरोपी अमोल याने उलटी केली. त्यामुळे विजयने अमोल याला रागाने हटकले. त्या कारणावरून आरोपींनी विजय यांना शिवीगाळ करून इंजिनच्या पार्टने बेदम मारहाण केली.