CSK captain IPL 2025 : आयपीएल 2025 सुरू असताना चेन्नई सुपर किंग्ज या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला दुखापत झाली आहे. झालेल्या दुखापतीमुळे तो संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाही. त्यामुळे आता गायकवाडच्या अनुपस्थितीत, त्याच्या जागी एमएस धोनी या हंगामातील उर्वरित सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे.
चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी केकेआर विरुद्धच्या सामन्यापूर्वी 10 एप्रिल ला ही माहिती दिली आहे. ऋतुराज गायकवाडच्या कोपरा फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ऋतुराज या हंगामात आता खेळू शकणार नाही. 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला कोपराची दुखापत झाली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जविरुद्धच्या पुढील दोन सामन्यांमध्ये तो खेळला असला तरी, स्कॅनमध्ये आता फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले आहे.
एमएस धोनी करणार ‘सीएसके’चं नेतृत्व
2024 च्या आधी एमएस धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडले होते, मात्र, आता तो पुन्हा एकदा कर्णधार म्हणून वापसी करणार आहे. या हंगामातील उर्वरित सामन्यांमध्ये तो संघाचे नेतृत्व करणार आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली, सीएसके आतापर्यंत 5 वेळा चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला आहे. आता या हंगामात परत एकदा संघाचे नेतृत्व त्याच्याकडे आल्याने सर्वांच्या नजरा संघाच्या कामगिरीवर असणार आहेत.