लोणी काळभोर, (पुणे) : लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत एकाला अटक केली आहे. शुक्रवारी (ता. 18) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास तरडे (ता. हवेली) हद्दीतील बी.पी.सी.एल. कंपनीच्या बाजुला निसर्ग हॉटेलच्या पाठीमागे आडबाजुला हि कारवाई करण्यात आली आहे.
सुनिल दत्तात्रय काळभोर (वय 42, रा. तरवडीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 2 हजार 585 रुपयांचा दारूचा साठा जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरडे गावच्या हद्दीत बी.पी.सी.एल. कंपनीच्या बाजुला निसर्ग हॉटेलच्या पाठीमागे आडबाजुला एक इसम त्याच्या ओळखीच्या लोकांना देशी विदेशी दारुची विक्री करीत असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी एक इसम निसर्ग हॉटेलच्या पाठीमागे आडोश्याला लोकांची गर्दी करुन त्यांना दारुची विक्री करीत असताना दिसला. त्यास पोलीसांनी जागीच पकडुन त्याचे नाव पत्ता विचारले असता सदर इसमाने त्याचे नाव पत्ता सुनिल काळभोर असे असल्याचे सांगितले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार चंद्रकांत माने करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार, दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार चंद्रकांत माने, विजय जाधव, विशाल बनकर, तौसीफ सय्यद यांनी केली आहे.