Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील शेतकऱ्याची सावकाराच्या तावडीतून सुटका; सहा वर्षांपूर्वीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 1 June 2024, 16:39
man acquitted from six years old case by daund court uruli kanchan

उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील शेतकऱ्याने पाट्स (ता. दौंड) येथील शेतजमीन खरेदी करण्यासाठी 15 लाख रुपये मासिक 5 टक्के व्याजदराने उडवंडी (ता. दौंड) येथील एका खाजगी सावकाराकडून घेतले होते. मात्र, व्याजासह रक्कम परत केल्यानंतरही सावकाराने शेतकऱ्याने दिलेले धनादेश बँकेत भरले. सदर धनादेश न वटल्यामुळे सावकाराने फिर्याद देत दौंड न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता. याबाबत मागील 6 वर्षांपासून हा खटला सुरु होता. आता या प्रकरणात न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी शेतकऱ्याची निर्दोष सुटका करत दिलासा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील शेतकरी विकास अमृत तुपे यांनी 25 फेब्रुवारी 2016 साली पाटस येथील शेत जमिनीची 50 गुंठे खरेदी करण्यासाठी उंडवडी (ता. दौंड) येथील सावकार भिकू जयसिंग कांबळे याच्याकडून 15 लाख रुपये मासिक 5 टक्के व्याजदराने घेतले होते. त्या रकमेच्या परतफेडीपोटी व हमीपोटी शेतकरी तुपे यांनी सावकाराला जमिनीची विसार पावती लिहून दिली होती. तसेच त्यांचे व वडिलांचे मिळून 11 कोरे धनादेश दिले होते.

त्यानंतर शेतकऱ्याने सदर शेतजमीन ज्ञानेश्वर आखाडे व चौंडकर यांना खरेदी दिली. ही बाब फिर्यादी यांना समजल्यानंतर सदर व्यवहाराच्या तडजोड पोटी 18 लाख 50 हजार रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर आरोपी तुपे यांनी फिर्यादी कांबळे यांना सर्व रक्कम व्याजासह परत दिली असताना देखील फिर्यादी कांबळे यांनी आरोपी तुपे यांना अॅट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली व त्यांच्याकडून खोटे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले.

त्यानंतर कांबळे यांनी तुपेकडून घेतलेले धनादेश बँकेत वटण्यासाठी भरले. मात्र सदर धनादेश वटले नाहीत. म्हणून फिर्यादी कांबळे यांनी शेतकऱ्याविरुध्द दौंड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदारी खटला दाखला केला. मात्र, न्यायालयीन कामकाजात आरोपी शेतकरी तुपे यांच्याविरुध्द दाखल केलेल्या केसमध्ये कोणतेही सबळ पुरावे सिध्द झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल देताना आरोपी शेतकरी तुपे यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

 

दरम्यान, सदर खटल्यामध्ये शेतकरी तुपे यांच्या वतीने अ‍ॅड. तानाजी ज्ञानोबा इंदलकर यांनी भक्कमपणे बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. ऋग्वेद इंदलकर व अ‍ॅड. शुभम खोमणे यांनी सहकार्य केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील ७ धडाकेबाज निर्णय! शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य ते वस्त्रोद्योग विभागापर्यंत काय बदललं? वाचा सविस्तर…

Tuesday, 8 September 2026, 19:04

पुण्यात खाकीला काळिमा! मद्यधुंद अवस्थेत पोलीस हवालदाराकडून तरुणीचा विनयभंग; हवालदाराला अटक, उपायुक्तांकडून निलंबनाची कारवाई

Tuesday, 8 September 2026, 18:59

हडपसर ते उरुळी कांचनदरम्यान रोजचीच वाहतूक कोंडी? वाहतूक विभाग याकडे लक्ष देईल का?

Tuesday, 8 September 2026, 18:22
Next Post

टँकर मागणीच्या प्रस्तावांना 12 तासात मंजुरी द्या : हर्षवर्धन पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp