Malegaon Crime : पुणे: पोलिस ठाण्यात यापूर्वी दाखल प्राणघातक हल्ल्याची केस मागे घे, असे म्हणत दोघांनी एकाला अडवत त्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना म्हसोबावाडी (ता. बारामती) येथे घडली. (brutal beatings to withdraw case; Crime registered in Malegaon Police Station)
याबाबत विराज रघुनाथ कोकरे (रा. मरिमातानगर, म्हसोबावाडी, ता. बारामती) यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. (Malegaon Crime) त्यानुसार सुशांत प्रशांत घोडके व निशांत प्रशांत घोडके यांच्यावर माळेगाव पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घोडके व कोकरे कुटुंबात यापूर्वी भांडणे झाली होती. विराज यांचे भाऊ चेतन यांनी घोडके यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याची फिर्याद दाखल केली होती. (Malegaon Crime) हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
शनिवारी सायंकाळी घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. 20) सायंकाळी विराज हे घराजवळ असलेल्या गोठ्यावर मुरघास घेऊन दुचाकीवरून जात असताना सुशांत व निशांत यांनी दुचाकीवरून येत त्यांना अडविले. (Malegaon Crime) आमच्यावर केलेली केस माघारी घे, नाही तर तुमचे घरदार संपवू, अशी धमकी त्यांनी केली.
सुशांत याने गाडीला लावलेला कोयता आणून फिर्यादीवर उगारला. दोघांना पाठीवर, गळ्यावर, लाथाबुक्क्यांनी, हाताने मारहाण करीत त्यांना जखमी केली.(Malegaon Crime) ही भांडणे सुरू असताना सचिन छबन साबळे यांनी तेथे येत भांडणे सोडवत फिर्यादीची सुटका केली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय उपचारांची चिठ्ठी दिली. उपचारांनंतर त्यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Baramati Crime : बारामती तालुक्यातील सांगवी येथे तरूणाचा दगडाने ठेचून खून ; परिसरात खळबळ..!