पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मोर्चा मंगळवारी (ता. २३) रांजणगांव येथून कोरेगाव भीमामार्गे चोखीदाणी, खराडी येथे मुक्कामी थांबणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने मराठा बांधव वाहनांसह सहभागी होणार आहेत. त्यामुळे २३ आणि २४ जानेवारी रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मोर्चा मार्गावर आणि परिसरात वाहतूक कोंडी होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. २३ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजल्यापासून नगरकडे जाणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल.
जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मोर्चा मंगळवारी, २३ जानेवारी रोजी रांजणगाव येथून कोरेगाव भीमामार्गे चोखीदाणी, खराडी येथे मुक्कामी थांबणार आहे. २४ जानेवारी रोजी चोखीदाणी, खराडी येथून पिंपरी-चिंचवड परिसरातून लोणावळा येथे मुक्कामी थांबणार आहे.
असे असतील पर्यायी मार्ग…
* मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरुन तसेच कोल्हापूर, सातारा येथून अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कात्रज – खडी मशिन चौक मंतरवाडी फाटा हडपसरमार्गे सोलापूर रस्त्याने केडगांव चौफुला – नाव्हरे शिरुरमार्गे जातील.
* वाघोली, लोणीकंदमार्गे अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची थेऊर फाटा (सोलापूर रस्ता) येथून वाहतूक केडगांव चौफुला नाव्हरामार्गे शिरुर ते अहमदनगर अशी वळविण्यात येईल.
* पुणे शहरातून अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने खराडी बायपास उजवीकडे वळण घेऊन मगरपट्टा चौकातून डावीकडे वळून सोलापूर रस्त्याने यवत केडगांव चौफुला- न्हावरे शिरुरमार्गे जातील.
२४ जानेवारी रोजी असे असतील पर्यायी मार्ग
* मराठा आरक्षण मोर्चा २४ जानेवारी रोजी पुणे शहरातून पिंपरी-चिंचवडच्या दिशेने जाणार आहे. त्याअनुषंगाने अहमदनगरहून पुणे शहराकडे येणारी सर्व वाहने थेऊर फाटा (लोणीकंद) येथून केसनंद-थेऊरमार्गे सोलापूर रस्ता अशी वळविण्यात येतील.
* वाघोली परिसरामधील वाहने वाघोली-आव्हाळवाडी-मांजरी खुर्द-मांजरी बुद्रुक-केशवनगर-मुंढवा चौक अशी वळविण्यात येतील.
* पुणे शहरातून अहमदनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना चंद्रमा चौकातून आळंदी रस्ता जंक्शन, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव, वाघोलीमार्गे अहमदनगरकडे अशी वळविण्यात येईल.
वाहतूक बदलांचा अवलंब करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.