हडपसर : भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा बलाढ्य पक्षांची महायुती म्हणजेच ट्रिपल इंजिनचे मजबूत सरकार आपले आहे. हेच ट्रिपल इंजिनचे सरकार ने मागील दहा वर्षांमध्ये हडपसरच्या विविध भागात विकास कामे केलेली आहेत. ही कामे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिसत नाहीत, कदाचित त्यांच्या चष्म्याचा नंबर वाढला असेल. यापुढेही हडपसर चा अत्याधुनिक विकास होण्याकरिता महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांना बहुसंख्य मतांनी निवडून द्यावे, असे आव्हान विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी केले.
महायुतीचे उमेदवार आमदार चेतन तुपे पाटील यांच्या प्रचारार्थ कोंढवा परिसरामध्ये विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. कोंढवा येथील येसाजी कामठे चौक, कै. दशरथ मरळ चौक, आंबेडकर नगर चौक, हनुमान आझाद चौक, भोलेनाथ चौक, शिवराज चौक, स्वराज चौक, हगवणे चौक, महावीर चौक, शिवशंभो नगर, व्हीआयपी कॉलेज, पत्रा मजेत चौक, भाटी चौक, बौद्ध विहार, काकडे नगर, शांतीनगर साळवे गार्डन, कासट कॉलनी चौक, वंदे मातरम चौक, साईनगर लेन नंबर ३, क्रांती चौक, शिवप्रतिष्ठान चौक, के एन के सोसायटी, गोकुळ नगर चौक, पाण्याची टाकी देवी मंदिर, टिळेकर नगर चौक, शिक्षक कॉलनी व शंकर मंदिर पर्यंत रोड शो करण्यात आला.
यावेळी आमदार चेतन तुपे पाटील, विधानपरिषद आमदार योगेश अण्णा टिळेकर, पुणे महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका नगरसेविका रंजनाताई टिळेकर, मा. जि.प.अध्यक्ष जालिंदर कामठे, माजी नगरसेवक वृषाली कामठे, माजी नगरसेवक विरसेन जगताप, राधाकीसन बधे, सुभाष बधे, शिवाजी मरळ, अशोक वाघ, वसंत कामठे, शामराव कामठे, माऊली कामठे, विश्वास समगिर आदी उपस्थित होते.