उरुळी कांचन, (पुणे) : येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाचे महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन येथील इयत्ता बारावीतील शास्त्र, कला, वाणिज्य व किमान कौशल्य या सर्व शाखांचा निकाल 93.01 टक्के लागल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी – मार्च 2024 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. इयत्ता बारावीला उरुळी कांचन येथील महाविद्यालयात एकूण 644 विद्यार्थी बसले होते. यातील 599 विद्यार्थी हे परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेचा निकाल हा 98.05 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल हा 99.52% टक्के, कला शाखेचा निकाल हा 69.60% टक्के, तर किमान कौशल्य या शाखेचा निकाल 91.7 टक्के लागला आहे.
विद्यालयातील सर्व शाखांमधून प्रथम पाच आलेले विद्यार्थी
कला शाखा – कु. श्रेया राजेश पोपळघट 91.83 टक्के,
वाणिज्य शाखा – हर्षल बंडू कड 91.33 टक्के, कु. ऋतुजा बापूराव आरे 87.83 टक्के, कु. पल्लवी पांडुरंग मिरगणे 87.83 टक्के, कु. पायल बाळासाहेब पवार, 87.50,
विज्ञान शाखा – वेद विष्णुराव कौलवार 83.67 टक्के,
दरम्यान, विद्यालयातील सर्व शाखांमधून उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य भारत भोसले, उपप्राचार्य, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त, तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.