Maharashtra Wheelchair Cricket : पुणे : दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन देऊन पुणे रोटरी क्लब ऑफ सेंट्रलचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून रोटरी क्लबने महाराष्ट्र व्हिलचेअर क्रिकेट संघाला १२ स्पोर्टस व्हिलचेअर भेट स्वरुपात दिले आहे. या रोटरी क्लबच्या उपक्रमाचे पुण्यासह राज्यात भरभरून कौतुक होत आहे.
वानवडी (पुणे) येथील टीसीसी क्लब लडकत मैदानात एका कार्यक्रमात नुकत्याच या व्हिलचेअर देण्यात आल्या आहेत. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष अजय चिटणीस व त्याच्या सहकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आल्या आहेत. यावेळी रमेश बागवे, महेश पुंडे , प्रसन्न लडकत, नरेंद्र देडगे व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, ‘दिव्यांग खेळाडूंसाठी या व्हिलचेअरचे वाटप करण्याअगोदर मैदानावर क्रिकेट सामना घेतला गेला. याच व्हिलचेअरवर बसून खेळाडूंनी क्रिकेट सामना खेळला. तेव्हा खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तसेच सर्व खेळाडू खुश झाले होते.
रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे व १२ व्हिलचेअर्सच्या अनमोल मदतीमुळे आम्ही महाराष्ट्र व्हिलचेअर क्रिकेट टीमला खूप पुढे घेऊन जाऊ. आशा करतो की, हे मदतीचे उचललेले मोठे पाऊल बघून समाजातील बहुतांश लोक आपल्या राज्याच्या टीमला नक्की पाठिंबा देतील. दिव्यांगासाठी समाजातून सहकार्य मिळाले तर आम्हा दिव्यांग बांधावांना आनंद वाटेल.
– ओंकार रौंदाळे, कर्णधार, महाराष्ट्र व्हिलचेअर क्रिकेट टीम
आतापर्यंत आम्ही रुग्णालयांना स्पोर्ट्स व्हिलचेअर दिल्या आहेत. परंतु, पहिल्यांदाच आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हिलचेअरचे दिव्यांग खेळाडूंना वाटप केल्या आहेत. यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये खेळाची प्रेरणा आणखी वाढत त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. रोटरी क्लबची या वर्षीची थीमसुद्धा Creat Hope in The World अशाच प्रकारची आहे. या संघाच्या माध्यमातून ‘विश्वात निर्माण करू आशा’
– अजय चिटणीस, अध्यक्ष, पुणे रोटरी क्लब ऑफ सेंट्रल.