युनुस तांबोळी
Mahadeo Jankar News : शिरूर : शेतकऱ्यांच्या दुधाला एकाच वेळी पाच रुपयाची दरवाढ देशात देऊन शेतकरी दुधउत्पादक यांच्यावर होणार अन्याय मी पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री असताना दुर केला, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची धमक राज्यकर्त्यानी ठेवली पाहीजे अन्यथा लाखोचा पोशिंदा असलेला बळीराजा पिढयानं पिढया कर्जबाजारी होत चालला आहे. याला जबाबदार राज्यकर्तेच असल्याची जोरदार टिका राज्यांचे माजी मंत्री व राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. (Rulers are responsible for generation after Baliraja’s debt market – Mahadev Jankar’s sharp criticism of the government)
शिरूर येथील शेतकरी मेळाव्यात केली टीका
शिरूर (जिल्हा पुणे) येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महादेव जानकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते होते. (Mahadeo Jankar News) यावेळी प्रदेश महासचिव ज्ञानेश्वर सलगर , माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे, रासपाचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील ,पुणे जिल्हा अध्यक्ष विनायक रुपनवर , महीला जिल्हाध्यक्ष सुनिता किरवे, अंकुश देवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील गोर गरीब मुलांसाठी युपीएसी परीक्षासाठी दिल्लीत स्पर्धा परीक्षा केंद्र निर्माण करण्याची संकल्पना राज्यांचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी मांडली. त्या साठी राज्यभरातुन लोकवर्गणी गोळा होत आहे. (Mahadeo Jankar News) त्यासाठी शिरूर पत्रकार संघाच्या वतीने ५१ हजार रुपयाची वर्गणी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन बारवकर व पारनेरचे जेष्ठ पत्रकार दत्ता उनवणे यांच्या हस्ते जानकर यांना देण्यात आली. या वेळी जेष्ठ पत्रकार अभिजीत आंबेकर, सतिष धुमाळ पोपट पांचगे, नवनाथ रणपिसे, सतिष केदारी उपस्थित होते.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राम कदम, माजी सरपंच लक्ष्मणराव वाळके, माजी चेअरमन अशोक माशेरे, लक्ष्मण पवार, रामदास थोरात, राजेंद्र कटके, पारनेरचे युवा नेते रुपेश ढवण, शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब आसवले, माजी सरपंच जगदिश पाचर्णे,यांच्यासह रासपाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे ,शिरूर शहर अध्यक्ष सिकंदर पटेल, महिला अध्यक्ष चेतनाताई पिंगळे, उपाध्यक्ष संताजी तिखोळे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अमित खांडेकर, युवा अध्यक्ष संदीप देवकाते, महीला उपाध्यक्ष सपना मलगुंडे, उपाध्यक्ष वाल्मिकराव करहे, राजेंद्र पुणेकर, संपर्ग प्रमुख राजेंद्र थोरात, सरचिटनिस विकास पवार , माजी युवा अध्यक्ष अमोल देवकाते, युवा महीला उपाध्यक ॲन्ड अपेक्षा कुरहाडे, देविदास पवार, विलास रोहीले, सुभाष घोडे, लक्ष्मण भाईक उपस्थित होते. (Mahadeo Jankar News)
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राचार्य गोरक्षनाथ दुबे यांनी तर प्रस्ताविक अध्यक्ष शिवाजीराव कुरहाडे यांनी केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :