उरुळी कांचन, (पुणे) : कामानिमित्त उरुळी कांचन येथून रेल्वेने पुण्याकडे जातो असे सांगून घराबाहेर पडलेले शिंदवणे (ता. हवेली) येथील 56 वर्षीय व्यक्ती मागील दोन महिन्यांपासून घरी परतलेच नसल्याची बाब समोर आली आहे. हि घटना 21 जुलै 2024 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मच्छींद्र माणिक महाडिक (वय- 56, रा. शिंदवणे रोड, काळेपडळ, शिंदवणे, ता. हवेली) असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा अक्षय मच्छींद्र महाडिक (वय – 27, रा. सदर) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 तारखेला मच्छींद्र महाडिक हे त्यांच्या मुलाला म्हणाले की, कामानिमित्त मला पुणे येथे जायचे आहे. उरुळी कांचन रेल्वे स्थानकावर सोड. त्यानुसार मुलगा अक्षय याने त्यांना रेल्वे स्थानकात सोडले व त्या ठिकाणावरून निघून गेला.
पुढील पाच दिवस वडील घरी न आल्याने अक्षय व त्याच्या कुटुंबीयांनी पाहुणे, नातेवाईक, यांच्याकडे चौकशी केली मात्र मिळून आले नाहीत. त्यामुळे 26 तारखेला उरुळी कांचन पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
दरम्यान, मच्छींद्र महाडिक वय -56, रंग – सावळा, उंची 5 फुट 4 इंच, शिक्षण 10 वी, मराठी व हिंदी भाषा बोलता येते. त्यांनी शर्ट व पॅंन्ट घातले असून पायात चप्पल आहे. अशा वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणाला माहिती मिळाल्यास उरुळी कांचन पोलीस ठाण्यात 02026926287 संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.