लोणीकंद, (पुणे) : श्रीलंका येथे आयोजित करण्यात आलेल्या “साऊथ एशियन फेडरेशन ऑफ ऑल स्पोर्ट्स” स्पर्धेसाठी लोणीकंद (ता. हवेली) येथील कुस्तीपटू प्रतिक रवींद्रकुमार महारनवर आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
श्रीलंका येथे 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा होत आहे. “साऊथ एशियन फेडरेशन ऑफ ऑल स्पोर्ट्स” 10 व्या दक्षिण आशियाई खेळ 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतिक महारनवर हा मुळचा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील डोंबाळवाडी येथील आहे. मागील 5 वर्षापासून लोणीकंद (ता. हवेली) येथील त्याचे मामा अमोल कंद यांच्याकडे राहतो. लहानपणापासूनच कुस्तीची आवड असल्याने वयाच्या 7 व्या वर्षापासून कुस्ती खेळण्यास सुरुवात केली.
आईचे निधन झाल्यानंतर मामा अमोल कंद यांनी सांभाळ केला. 2019 साली लोणीकंद येथे आल्यानंतर पुन्हा त्याच जोमाने कुस्ती खेळण्यास सुरुवात केली. 2024 मध्ये घेण्यात आलेल्या नागपूर चंडीगड, हरियाणा या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. त्याला या स्पर्धेत विविध पदके व पारितोषिके मिळाली आहेत. श्रीलंका येथे 8 ते 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या “साऊथ एशियन फेडरेशन ऑफ ऑल स्पोर्ट्ससाठी प्रतिकची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रतिकला मोलाचे मार्गदर्शन मामा अमोल कंद, वस्ताद सुमित अरविंद भोसले, थेऊर ग्रामपंचायतीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते पै. युवराज काकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रतिक महारनवर यांची निवड झाल्याने सर्व घटकातून स्वातीचे अभिनंदन करण्यात आले.
याबाबत बोलताना प्रतिक म्हणाला, “लहानपणापासूच कुस्ती खेळण्याची आवड आहे. काही दिवस कुस्ती खेळण्यासाठी बंद केली होती. मात्र मामा अमोल कंद यांनी मार्गदर्शन केले व कुस्ती खेळण्यासाठी पुन्हा एकदा जोमाने सुरुवात केली. यावेळी 2024 साली घेण्यात आलेल्या नागपूर, चंडीगढ, हरियाणा येथे स्पर्धेत विविध पदके व पारितोषिक मिळाले आहे. श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत निवड झाल्याने आनंदी आहे. या ठिकाणावरूनहि भारतासाठी व नक्कीच पदक मिळवणार आहे.