लोणी कंद : Loni Kand Crime – तीन दिवसांसाठी कार भाडेतत्वावर (embezzling rented car) नेऊन तिचा अपहार (shackled the accused ) करून पसार झालेल्या आरोपीला लोणीकंद पोलिसांनी (Lonikand police) बारामती येथून मुसक्या आवळल्या. (shackled) लोणीकंद पोलिसांनी (Lonikand police) केलेल्या कामगिरीमुळे तक्रारदारांनी पथकातील कर्मचार्यांचे हार फेटे घालुन आभार मानले.( Loni Kand Crime)
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव
सागर दिलीप जगताप (रा. मु. पो. खोपवाडी, सुपा, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विलास विनायक साळुंखे (रा. वाघेश्वर सोसायटी, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास साळुंखे यांची ७ लाखांची कार आरोपी सागर याने ३ दिवसांसाठी भाडेतत्वावर १० सप्टेंबर रोजी घेतली होती. परंतु, ती कार व त्या कारचे भाडे न देता पोबारा करत गाडीचा अपहार केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्याच अनुषंगाने तपास करताना अमंलदारांना तांत्रिक विश्लेषणात सागर हा बारामती येथे असल्याचे व कारला खोटी नंबरप्लेट लावून तो वापरत असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्याला बारामतीतून बेड्या ठोकल्या. यावेळी अपहार केलेली कार मिळाल्याचा आनंद झाल्याने तक्रारदाराने पोलिसांचा सत्कारकरून आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा :
गणपती विसर्जनात लोणी कंद पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराने धरला ठेका ; व्हिडिओ व्हायरल…!