Lonikand News : लोणीकंद : वाघोली (ता. हवेली) येथे दारु पिताना झालेल्या वादातून मित्रावर धारधार शस्त्राने वार करुन खून करणाऱ्या दोघांना लोणीकंद पोलिसांनी ४८ तासाच्या आत अटक केली आहे.
लोणीकंद पोलिसांची कामगिरी
शैलेश उर्फ शैलेंद्र मंडगीकर (वय-२२ रा. लेबर कॅम्प, केसनंद रोड, वाघोली, मुळ रा. मंडगी, पो. नरंगल बुद्रुक, ता. देगलुर, जि. नांदेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर राम सुभाष श्रीराम/श्रीरामे (वय-२२ रा. मुपो बेरळी बुद्रुक, ता. मुखेड जि. नांदेड) व गोपाल ज्ञानोबा कोतलापुरे (वय-२६ रा. नांदेड नाका, महादेवनगर, जि. लातुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश मंडगीकर व आरोपी राम श्रीरामे, गोपाल कोतलापुरे हे एकमेकांचे मित्र होते. दोन दिवसांपूर्वी ते दारू पिण्यासाठी ते एकत्र आले होते. तेव्हा आरोपी आणि मयत यांच्यामध्ये काम केल्याचे पैसे देण्यावरुन वाद झाला होता. (Lonikand News) याच वादातून आरोपींनी शैलेश याचा वाघोली परिसरात सिट्रोन सोसायटीच्या समोर मंगळवारी (ता.२२) रात्री पावणे बाराच्या सुमारास धारधार शस्त्राने वार करुन खून केला. आणि दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या हत्येची माहिती मिळताच, लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा तपास सुरू केला. आरोपींचा शोध घेत असताना, पोलिसांना आरोपी श्रीरामे हा तुळजापूर येथे नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार एक पथक तेथे पोहचले व सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
दरम्यान, आरोपी श्रीरामे यांच्याकडे चौकशी केली असता त्याचा दुसरा साथीदार गोपाल कोतलापुरे हा लातुर येथे गेल्याची माहिती मिळाली. (Lonikand News) त्यानुसार आरोपीच्या मागावर दुसरे पथक रवाना करण्यात आले. मात्र, आरोपी वाघोलीला परत येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांच्या पथकाने आरोपीला चोखी ढाणी परिसरातून ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना सोमवार (ता.२८ ऑगस्ट) पर्यंत पोलीस कोठडी रिमांड सुनावली आहे.
ही कारवाई लोणी कंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर, (Lonikand News) आण्णासाहेब टापरे, निखिल पवार, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, सुरज गोरे, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकाटे, स्वप्निल जाधव, विनायक साळवे, रितेश काळे, सागर जगताप, मल्हारी सपुरे यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Lonikand News : लोणीकंद पोलिसांकडून गरीब विद्यार्थ्याला शालेय साहित्य व आर्थिक मदतीचा हात..