Lonikand News : लोणीकंद, (पुणे) : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भावडी येथील एक सराईत गुन्हेगार पुणे शहर, जिल्हा, व पिंपरी चिंचवड परिसरातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आला आहे. अशी माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी दिली.
बिरा रामदास श्रीराम वय – ३५,रा. भावडी ता. हवेली जि. पुणे असे तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोणीकंद पोलिसांची कामगिरी..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आसपासच्या भागात दहशत निर्माण करुन लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देऊन दहशत निर्माण करायचे. (Lonikand News) लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातून कायद्याविषयी संभ्रम निर्माण होवु नये, तसेच सदर सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने हि कारवाई करण्यात आली आहे.
गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर इसम यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांना प्रस्ताव पाठविला असता,(Lonikand News) शशिकांत बोराटे यांनी सदर सराईतास पुणे शहर, जिल्हा, व पिंपरी चिंचवड परिसरातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे.
सदरची कामगिरी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारूती पाटील, सीमा ढाकणे, (Lonikand News) सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार प्रशांत कापुरे, सागर कडू यांनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Lonikand News : लोणीकंद परिसरातील चार गुंड दोन वर्षांसाठी तडीपार