Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : खेड शिवापूर परिसरात मुरुम माफिया जोमात; अवैध उत्खननाला महसूल कर्मचाऱ्यांचा कृपाशीर्वाद?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 17 September 2023, 14:29

जीवन सोनवणे

Bhor News : भोर/हवेली : तालुक्यातील महामार्गालगत असणाऱ्या खेड शिवापूर परिसरात मुरुम माफियांनी मुरूम उत्खननाचा सपाटा चालविला आहे. सपाटीकरणाच्या नावाखाली येथून हजारो ब्रास मुरुमाचे बेकायदेशीरपणे उत्खनन होऊनही महसूल कर्मचारी धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत. यामुळे मुरूम उत्खनन व्यवसायाला गती आल्याचे दिसून येत आहे. महसूल विभागाचे याला पाठबळ असल्याचे परिसरातील ग्रामस्थांचे मत आहे.

महसूलचे पाठबळ असल्याचे ग्रामस्थांचे मत

भोर तसेच हवेली तालुक्यात मुरूम चोरीचे प्रस्थ वाढत असल्याचे पाहावयास मिळत आहे. शेतीचे उत्खनन करण्याच्या नावावर माती मुरुमाची बेकायदेशीररीत्या तस्करी बिनधास्त सुरू आहे. (Bhor News) राजरोसपणे जेसीबी, पोकलेन मशिनच्या साहाय्याने नियमापेक्षाही जास्त जमीन खोदून मुरूम लंपास केला जातो. हा सगळा प्रकार इतका सराईतपणे होत आहे की, कुणालाच कायद्याची किंवा कारवाईची भीती वाटत नाही. यामागे काय गौडबंगाल आहे, याचे गणित सामान्य माणसाला उलगडत नाही.

कमी ब्रासची रॉयल्टी काढून जास्त ब्रास मुरूम काढणे किंवा शेकडो ब्रास रॉयल्टीच्या नावाखाली हजारो ब्रास मुरूम काढण्याच्या अनुचित प्रकाराने शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला जात आहे. महसूल प्रशासनाने रॉयल्टीधारकांनी दिलेल्या नियोजित जागेवर जाऊन परवानगी आणि प्रत्यक्ष केलेले उत्खनन यांची चौकशी करून, कारवाई केल्यास रॉयल्टीच्या नावावर मोठे घबाड उघडे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Bhor News) तालुक्यात व भागात असलेल्या इतर गौण खनिजांबाबत देखील हेच असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हायवेलगत असणाऱ्या गावात दिल्या गेलेल्या खानपट्टा परवान्यामुळे मोठ्या प्रमाणात निसर्गाचा ऱ्हास होत आहे.

 

परवाना नसताना उत्खनन
जिल्हा किंवा तालुका प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना नाही, तरी देखील मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन केले जात आहे. तालुका प्रशासनाने परवाना दिला नाही. मात्र, हजारो ब्रास माती-मुरुमाचे उत्खनन केले जात आहे.

प्रशासनाची डोळेझाक
परिसरात नियमबाह्य मुरुमाचे उत्खनन होत आहे. संबंधित कंत्राटदारांनी खनिकर्म व तालुका प्रशासनाच्या कारवाईकडे डोळेझाक करीत, बेकायदेशीररीत्या केलेल्या उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हायवेलगत असून देखील याकडे कुणाचेही लक्ष नाही. (Bhor News) प्रशासनातील संबंधित अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. परिणामी सपाटीकरणाच्या नावाखाली रात्रंदिवस मुरुमाची बेधडकपणे वाहतूक होत असून, स्थानिक जबाबदार महसूल प्रशासनाने डोळेझाक केली आहे.

महामार्गालगत नूतन व्यवसाय सुरू करण्यासाठी टेकडी फोड
महामार्गालगतच्या जागेमध्ये टेकड्या फोडून त्याठिकाणी सपाटीकरणाच्या नावाखाली नूतन व्यवसायासाठी सपाट जागा तयार करून, त्याठिकाणी असणारा मुरूम त्याच ठिकाणी वापर न करता इतरत्र वापरला जात आहे. (Bhor News) प्रशासन व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे का, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.

सपाटीकरणाच्या नावाखाली उत्खनन
खेडशिवापूर परिसरातील महामार्गालगत असणाऱ्या जमिनी व टेकड्या यांचा सपाटीकरणाचा तात्पुरता परवाना घेऊन, त्याचठिकाणी असणारा मुरूम इतर ठिकाणी राजरोसपणे वापरला जात आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Loni Kalbhor News : …तर पुढील काळात मंत्रालयात मेंढ्या सोडणार ; लोणी काळभोर येथे धनगर समाज युवक संघाचा इशारा..

Loni Kalbhor News : कौतुकास्पद ! लोणी काळभोरच्या महिला अख्ख्या राज्यात भारी; राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेत लोणीचा ‘नक्षत्र’ ग्रुप राज्यात पहिला

Bhor News : भोर येथील मत्स्य व्यावसायिकांच्या जागेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा ; खासदार सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मांजरीतील A.M कॉलेज जवळील ‘श्री सुगंधालय’ दुकान पेट्रोल ओतून पेटवले 3 जणांचे कृत्य CCTV मध्ये कैद, 4 ते 5 लाखांचे नुकसान

Monday, 7 September 2026, 10:57

सुंदरबन फळे-पालेभाज्या प्रक्रिया क्लस्टरला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची संधी; शेतकरी, महिला व युवकांना रोजगार

Monday, 7 September 2026, 10:52

पहाटे 3 वाजता गोळीबाराचा आवाज अन् रक्तरंजित थरार! 4-5 जणांनी तरुणाला घेरलं, भोरमध्ये निर्घृण हत्या

Monday, 7 September 2026, 10:29

दहीहंडी फोडण्यासाठी बारामतीहून पुण्यात आला अन् दिवे घाटात काळाचा घाला! 22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Monday, 7 September 2026, 9:58

सलमान खानच्या Bigg Boss 20 मध्ये कोण-कोण? मेरी कोमपासून सोशल मीडिया स्टार्सपर्यंत यावेळी असणार ‘हे’ भन्नाट स्पर्धक

Monday, 7 September 2026, 9:22

MPSC पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट! 270 पानांच्या WhatsApp चॅटमधून धक्कादायक खुलासे

Monday, 7 September 2026, 9:04
Next Post

Lonikand News : भावडी येथील अट्टल गुन्हेगार २ वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp