Loni Kalbhor : लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठात झालेल्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेत सॉफ्टवेअर गटात ‘अविण्या’ तर हार्डवेअरमध्ये ‘वे टू गो’ या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
सॉफ्टवेअर गटात ‘अविण्या’ तर हार्डवेअरमध्ये ‘वे टू गो’ प्रकल्प प्रथम
विद्यार्थ्यांमध्ये नवीन तांत्रिक प्रगतीला चालना देण्यासाठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेची प्राथमिक फेरी एमआयटी विद्यापीठात नुकतीच पार पडली. या स्पर्धेचे आयोजन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्या विद्यमाने करण्यात आले होते. (Loni Kalbhor ) या स्पर्धेचे उद्घाटन व समारोप समारंभ राज कपूर सभागृहात पार पडला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु तथा कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश कराड, डॉ. सुनिता कराड, स्कुल ऑफ बायोईंजिनिअरींग व रिसर्चच्या प्रमुख प्रा.डॉ.रेणू व्यास, डॉ.मोहित दुबे, डॉ.विरेंद्र भोजवानी, डॉ. सुराज भोयार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा.डॉ.कराड म्हणाले की, विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे महत्व मोठे आहे. विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या ज्ञानाचे रुपांतर मानव जातीच्या कल्याणासाठी प्रात्यक्षिक द्वारे करण्यासाठी हॅकेथॉन सारख्या स्पर्धा उत्तम व्यासपीठ मिळवून देतात. (Loni Kalbhor ) असे कराड यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. अन्न तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, डिझाइन, जैवतंत्रज्ञान आणि व्यवसाय यासह विविध पार्श्वभूमीतील तब्बल १३३ गटांच्या माध्यमातून ८०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. (Loni Kalbhor ) ज्यामध्ये सॉफ्टवेअर व हार्डवेअर या दोन प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले नाविण्यपूर्ण संशोधन सादर केले. हार्डवेअर गटात ‘वे टू गो’ तर सॉफ्टवेअर गटात ‘अविण्या’ या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकाविला. ही स्पर्धेची प्राथमिक फेरी असल्याने सुमारे ३० प्रकल्पांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे नियोजन स्कुल ऑफ कॉम्पुटिंगच्या प्रमुख प्रा.डॉ. रेखा सुगंधी व प्रा.सुरेश कापरे यांच्या मार्फत करण्यात आले होते. (Loni Kalbhor ) तर या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी, प्रा.अश्विनकुमार महिंद्रकर, डॉ.संतोष दराडे यांच्यासह राकेश सिद्धेश्वर, संदीप मादीवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor : निरोगी हृदय राखणे ही सामायिक बांधिलकी : डॉ. सूरज इंगोले
Loni Kalbhor : दुचाकीचा कट मारल्याचा विचारला जाब; तरुणावर कोयत्याने सपापसप वार