Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : लोणी काळभोर पोलिसांच्या सतर्कतेने हरवलेली २ चिमुरडी पालकांच्या कुशीत..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 6 January 2024, 11:20

लोणी काळभोर,(पुणे) : अलीकडच्या काळात लहान मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतून बेपत्ता ४ वर्षाची दोन लहान मुले पोलिसांच्या समयसुचकतेमुळे अवघ्या तासाभरात आईवडिलांच्या कुशीत सामावली आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे परिसरात कौतुक केले जात आहे.

मुलीसा प्रकाश थापा (वय- ०४) व प्रतिक प्रकाश थापा (वय – साडेतीन वर्ष), रा. दोघेही, संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली), अशी मुलांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. ०५) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलांचे आई-वडील हे कदमवाकवस्ती परिसरातील संभाजीनगर परिसरात राहतात. शुक्रवारी (ता. ०५) घरातील गस संपल्याने दोन्ही मुलांना घरी ठेऊन दोघेही गस आणण्यासाठी गेले होते. यावेळी राहत्या घरापासून खेळता-खेळता दोन्ही मुले वाट चुकली, एक-दोन नाही तर घरापासून दोन ते अडीच किलोमीटर लांब, वाहनांच्या गर्दीतून वाट काढत लोणी काळभोर स्मशानभूमी परिसरात येऊन थांबले.

 

यावेळी वाहनांच्या कर्णकर्कश आवाज, गाड्यांच्या गोंगाटात दोन्ही मुले स्मशानभूमी येथील रस्त्यावर वाहनांना आडवे पळताना आनंद खाडे (रा. सिद्राममळा, लोणी काळभोर) यांना दिसली. त्यांनी तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे व पोलीस हवालदार योगेश कुंभार यांना मुलांची माहिती दिली. जोजारे यांनी मुलांना नाव विचारण्याचा प्रयत्न केला मात्र लहान असल्याने त्यांना स्वत:चे नाव सांगता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांसमोर त्यांच्या आई-वडिलांना शोधण्याचे आव्हान होते.

दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली जोजारे व त्यांचे सहकारी शोध घेऊ लागले. शोध घेत असताना संभाजीनगर येथील प्रकाश थापा यांची दोन्ही मुले बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार खात्री करून दोन्ही मुले सुखरूप पालकांच्या स्वाधीन केली. सलग दुसऱ्यांदा अशी कामगिरी केल्याने पोलिसांकडे आशावादी नजरेने नागरिक बघत असल्याचे या घटनेने सिद्ध होत आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मावळात; किवळेत शिवसेनेचा मेळावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.