लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरातील सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी गुरुवारी (ता.२०) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी सुमारे १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर ५ जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल सुधाकर गायकवाड (वय-३८, रिक्षा चालक, रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली), अक्षय सुनिल सोनवणे (वय-२८, रिक्षा चालक, रा. घोरपडे वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) जगनाथ सुर्यभान कणसे (वय-४० रिक्षा चालक, रा. सोरतापवाडी, लोणी काळभोर, ता. हवेली), अप्पा निवृत्ती चव्हाण (वय-५३, हमाली, रा. कवडीपाट टोलनाका, लोणी काळभोर, ता. हवेली) व तेजस अनिल सोनवणे (वय-३१, चालक रा. लोणी काळभोर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार आशितोष सुरेश गवळी यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये काही चालक खुलेआम अवैध जुगार खेळत आहेत. अशी माहिती पोलिसांनी मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता पाच आरोपी जुगार खेळताना आढळून आले.
दरम्यान, पोलिसांनी या कारवाईत सुमारे १२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार केतन धेंडे करीत आहेत.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, पोलीस हवालदार केतन धेंडे व पोलीस अंमलदार आशितोष गवळी यांच्या पथकाने केली.