Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरफोडी व दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक; दोन गुन्ह्यांची उकल तर 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 17 July 2025, 13:34

लोणी काळभोर, ता.17 : लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घरफोडी व दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. सोनू उर्फ यश ज्ञानेश्वर खलसे (वय-22, रा. टिळेकरनगर कात्रज, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन गुन्ह्यांची उकल करून सुमारे 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत, फिर्यादी गणेश बंडू कुंभार (वय ३०, रा. राहिंज वस्ती लोणी काळभोर ता हवेली जि पुणे) हे प्लंबींगचे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कुंभार हे नेहमीप्रमाणे काम करून 26 जूनला घरी आले होते. त्यांनी त्यांची दुचाकी पार्किंगमध्ये पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी 27 जूनला सकाळी उठल्यानंतर कुंभार यांना दुचाकी आढळून आली नाही. याप्रकरणी गणेश कुंभार यांनी दुचाकी चोरीची लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दुसऱ्या घटनेत, दादासाहेब नवनाथ नागटीळक (वय 29, रा. माळीमळा राजेंद्र पेट्रोल पंपाच्या पाठीमागे लोणी काळभोर) हे एचडीएफसी बँक विमाननगर येथे नोकरी करीत असुन त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातुन ते त्यांच्या कुंटुबाचा उदरनिर्वाह चालवितात. फिर्यादी नागटीळक यांच्या घरी कोणी नसताना अज्ञात चोरट्याने घराचे लॉक तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरामधील १ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, 18 हजार रुपये किंमतीची एल सी डी टिव्ही व दहा हजार रुपयांची रोकड चोरून नेली. सदर प्रकार हा 23 जून ते 27 जून या कालावधीत घडला आहे. अशी फिर्याद दादासाहेब नागटीळक यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कायदा कलम 331 (3) (4),305, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणून आरोपींना पकडण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पथकाने 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तेव्हा त्यामध्ये पोलिसांना दोघांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या. पोलिसांनी कात्रज येथून सापळा रचून आरोपी सोनू उर्फ यश ज्ञानेश्वर खलसे याला अटक केली आहे.

दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी सोनू उर्फ यश खलसे याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने दोन्ही गुन्हे एका साथीदाराच्या मदतीने केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. तसेच आरोपीकडून दोन गुन्ह्यांची उकल करून दुचाकीसह सुमारे 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यास लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. तर आरोपीचा दुसरा साथीदार हा फरार झाला आहे. मात्र लोणी काळभोर पोलिसांचे एक पथक आरोपीच्या मागावर आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, अनिल जाधव, पोलीस हवालदार तेज भोसले, गणेश सातपुते, रामहरी वणवे, पोलीस अंमलदार सुरज कुंभार, चक्रधर शिरगिरे, प्रवीण धडस, बाजीराव वीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

Mall Fire: मॉलला भीषण आग, 60 जणांचा होरपळून मृत्यू, तर अनेकजण बेपत्ता!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.