लोणी काळभोर : बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला प्रेमाचे आमिष दाखवून विनयभंग करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आदित्य विश्वास रायकर, (वय १८, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी १६ वर्षीय पिडीतेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी ही लोणी काळभोर परिसरात राहत असून येथील एका नामांकित विद्यालयात शिक्षण घेत आहे. याच विद्यालयात आरोपीही शिक्षण घेत आहे. दरम्यान, पिडीत मुलगी आणि आरोपीची एकमेकांशी ओळख झाली. या ओळखीतून एकमेकांची मैत्री झाली. चांगली मैत्री झाल्यानंतर आरोपी आदित्य व मुलीने एकमेकांचे नंबर घेतले. त्यानंतर आदित्य हा पिडीतेला व्हाटसअॅप, इन्स्टाग्राम व स्नॅपचॅटवरून बोलत होता. त्यानंतर दोघांचे प्रेमसंबंध जुळले.
दरम्यान, एके दिवशी आदित्यने व्हॉट्सॲपवर मेसेज केला की, तू मला तुझे न्युड फोटो पाठवशिल का? त्यावर मुलीने नकार दिला. त्यानंतर आरोपीने तिच्याशी ब्रेकअप केले. काही दिवसांनंतर आदित्यने पिडीतेला इंस्टाग्रामवरुन मेसेज केला. त्यानंतर त्यांचे पुन्हा बोलणे सुरु झाले. एके दिवशी पुन्हा न्युड फोटो पाठव, असे मेसेज करु लागला. त्याच्या वांरवार मागणीला कंटाळून एके दिवशी मुलीने फोनमधील काही खाजगी फोटो काढून आदित्यला स्नॅपचॅट या अॅपवर पाठवले. आरोपी आदित्य हा पिडीतेला वारंवार न्यूडफोटो पाठव, असा दबाब टाकू लागला. तेव्हा पिडीतेने त्यास नकार दिल्यानंतर आरोपीने पिडीतेशी बोलणे बंद केले. त्यानंतर पिडीतेने स्नॅपचॅटच्या खात्यावरुन पाठवलले फोटो डिलीट केले व दोघांचे बोलणे बंद झाले.
त्यानंतर पिडीतेला मागील दोन दिवसांपूर्वी बुधवारी (ता.१९) मित्रांकडून समजले की, तिचे न्युड फोटो आदित्यच्या मोबाईलमध्ये आहेत व तो सगळया मुलांना दाखवतो आहे. आदित्यने खाजगी फोटो इतर मुलांना दाखवून पिडीतेचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी आदित्यच्या विरोधात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.